केरळ : यूट्यूब सेलिब्रिटी श्रीकांत वेट्टीयारवर बलात्काराचा गुन्हा

Sreekanth Vettiyar
Sreekanth Vettiyargoogle
Updated on: 

केरळमधला (keral) प्रसिद्ध यूट्यूबर सेलिब्रिटी श्रीकांत वेट्टीयारने (Sreekanth Vettiyar) एका महिलेला लग्नाचं वचन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी कोलम जिल्ह्यातील पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर कोची सेंट्रल पोलिसांनी श्रीकांतवर बलात्काराचा गुन्हा (Rape crime) दाखल केला. कोचीमधील एका सदनिका आणि हॉटेलमध्ये आरोपीनं दोन वेळा पीडित महिलेवर क्रूरपणे बलात्कार केला असल्याचं महिलेनं केलेल्या तक्रारीत म्हटलंय. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Rape case registered against you tube celebrity Sreekanth Vettiyar in kerala)

Sreekanth Vettiyar
ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचं निधन

"श्रीकांत हा प्रसिद्ध यूट्यूबर आहे. तो महिला सबलीकरणाच्या विषयांमध्ये नेहमीच सक्रिया भूमिका घेत असल्याने त्याने सोशल मीडियावर ठसा उमटवला. त्यामुळे त्याचे मी फॅन झाली होती. त्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. फेब्रुवारी २०२१ मध्ये श्रीकांतने मला त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं होतं. त्यावेळी एर्नाकुलमच्या अलुवामध्ये एका फ्लॅटमध्ये श्रीकांतने माझं लैंगिक शोषण केलं.

तसंच कोचीतल्या एका हॉटेलमध्येही त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार केला. तक्रार मागे घेण्यासाठी त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने मला त्रास देण्याचाही प्रयनं केला. " असं पीडित महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, पीडित महिलेनं श्रीकांत विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Thousands of Police Deployed and Monitored via Drones in Connaught Place Central Park Area; Police Ban on March
Breaking Marathi News live Updates
"High-alert over 'Lehra Do Tiranga' march in Delhi; Intense debate in political circles."
CJP Tiranga March :
Marathi News Esakal
www.esakal.com