esakal | शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर म्हणाले....
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर म्हणाले....

शरद पवारांच्या भेटीनंतर प्रशांत किशोर म्हणाले....

sakal_logo
By
नामदेव कुंभार

व्यूहरचनाकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची महिनाभरानंतर दुसऱ्यांदा भेट झाली. दिल्लीतील शरद पवार यांच्या निवास्थावर जाऊन प्रशांत किशोर यांनी भेट घेतली होती. त्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना प्रशांत किशोर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ते म्हणाले की, 2024 च्या निवडणूकीत भाजपला तिसरी किंवा चौथी आघाडी कोणतेही आव्हान निर्माण करु शकते असं मला वाटत नाही. तसेच सोमवारी (21 जून 202 रोजी) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानावर होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचेही सांगितलं. एनडीटीव्हीशी बोलताना पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचाही खुलासा प्रशांत किशोर यांनी केला आहे.

शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सक्रीय झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वातावरण तापले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जींच्या विजयात मोलाचा वाटा असलेले व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यात राष्ट्रीय पातळीवर इतर विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर सोमवारी दिल्लीमध्ये प्रशांत किशोर हे शरद पवार यांना पुन्हा एकदा भेटले. दीड तास चाललेल्या या बैठकीतील चर्चेचे मुद्दे गुलदस्तात असतानाच उद्या (ता. २२) पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि ‘राष्ट्र मंच’ या नावाखाली राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची बैठक होणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा: 'प्रशांत किशोर ६० वेळा येऊन भेटले तेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला'

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांतकिशोर यांनी सोमवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. या भेटीनंतर बोलताना मात्र त्यांनी धक्कादायक विधान केले आहे. ‘माझा तिसरा किंवा चौथ्या आघाडीवर विश्‍वास नाही कारण या आघाड्या भाजपला आव्हान देऊ शकतील असे वाटत नाही. कारण, अशा आघाडीची अनेकदा चाचपणी करण्यात आलेली आहे. हा फार जुना प्रयोग आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तो फारसा प्रभावी ठरणार नाही’, असे स्पष्ट मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचा: शरद पवार- प्रशांत किशोर भेट राजकीय नाही : अजित पवार

पवारांची भेट का?

प्रशांतकिशोर यांनी सोमवारी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुन्हा भेट घेतल्यानंतर चर्चेला उधाण आले होते. दहा दिवसांतील ही दुसरी भेट होती. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं होतं. पण प्रशांत किशोर यांनी या भेटीमागील कारण सांगितलं आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, तिसऱ्या आघाडीबद्दल चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो नव्हतो. दोन्ही बैठकींमधून आम्ही दोघे एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यापूर्वी आम्ही कधीही एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळेच या बैठकींमधून आम्ही एकमेकांचे विचार जाणून घेत आहोत. पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, भाजपविरोधात लढताना आम्ही वेगवेगळ्या राज्यांमधील राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. भाजपाला टक्कर देताना कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या गोष्टी काम करु शकतात आणि कोणत्या नाही यावर आमची चर्चा झाली. सध्या आम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करत नाही.

काँग्रेसमध्ये अस्वस्थता

काँग्रेसेतर पक्षांची आघाडी स्थापनेची चर्चा रंगली असताना काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेसने अधिकृतपणे यावर भाष्य करण्याचे टाळले असले तरी ही बैठक राजकीय स्वरुपाची असल्याचे पक्षाचे मानणे आहे. यासाठी काँग्रेसला निमंत्रण का दिले नाही हे संयोजकांना विचारा, अशी टिप्पणी काँग्रेसच्या सूत्रांनी केली. तसेच पक्षाच्या सहभागाबाबत बोलण्याचे टाळले. मात्र, पक्षाचे खासदार असलेल्या के. टी.एस. तुलसी यांचा निमंत्रितांमध्ये समावेश असल्याकडे लक्ष वेधले असता, पक्षाचे अधिकृत म्हणणे त्यांना कळविले जाईल, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

loading image