शेतकऱ्यांसाठी कायपण! आणखी एका मित्रपक्षाने घेतलं भाजपसोबत वैर

farm laws
farm laws

कृषी कायद्याच्या विरोधात मैदानात उतरलेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली असताना NDA ला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमधील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (RLP) ने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पार्टीचे  संयोजक आणि राजस्थानमधील नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी कृषी कायद्याच्या समर्थनार्थ तीन्ही संसदीय समितीचा राजीनामा दिला होता.  

अलवर जिल्ह्यातील शाहजहांपुरमध्ये शेतकरी बांधवांच्या सभेला संबोधित करताना  बेनीवाल म्हणाले की, ''मी राष्ट्रीय लोकशाहीसोबत फेविकॉलने चिटकलेलो नाही. मी त्यांच्यापासून आता विभक्त होत आहे. बेनीवला यांनी वादात अडकलेल्या कृषी कायद्याच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरलेल्या शेतकऱ्यांचे समर्थन केले होते. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीला कूच करत असल्याची घोषणाही त्यांनी शुक्रवारी केली होती.  

एनडीएची साथ सोडली असली तरी काँग्रेससोबत मोठ बांधणार नाही, असेही RPL प्रमुख हनुमान बेनीवाल यांनी स्पष्ट केले आहे. मी कृषी कायद्याचा विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एनडीएतून बाहेर पडलो आहे. कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असे सांगताना काँग्रेसशी लगट करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
कृषी कायद्यातील व्यापक बदल करणाऱ्या तीन नव्या कायद्याच्या विरोधात शेतकरी ऐकवटले असून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कायदा मागे घेतल्याशिवाय सरकारशी चर्चा होणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. मात्र सध्याच्या घडीला शेतकरी नेत्यांनी सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. एका बाजूला चर्चेची तयारी दाखवली असताना दुसऱ्या बाजूने आंदोलन मजबूत करण्याच्या हालचालीही दिसत आहेत. त्यातच आता मित्रपक्षाने एनडीएतून बाहेर पडल्यामुळे चर्चेतून मार्ग निघण्याचे संकेत कमी होत आहेत. आंदोलनाला एक वेगळी दिशा देऊन फूट पडण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com