esakal | लशी थिरकताहेत गाण्याच्या तालावर; लशीकरणाच्या जागृतीसाठी पोलिसांचा हटके संदेश

बोलून बातमी शोधा

dancing vaccine

लोकांना लशीकरणाबाबत जागरुक करणारा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

लशी थिरकताहेत गाण्याच्या तालावर; लशीकरणाच्या जागृतीसाठी पोलिसांचा हटके संदेश
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तिरुवनंतपूरम : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लशीकरणाचा जोर आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार देखील लशीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. यासंदर्भातच लोकांना लशीकरणाबाबत जागरुक करणारा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. केरळ पोलिसांनी हा व्हिडीओ बनवला आहे. केरळ पोलिसांनी 'रासपुतिन चँलेज' घेऊन लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. 

केरळ पोलिसांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशीला एका गाण्यावर नाचताना दाखवलं आहे. बोनी एम यांच्या रासपुतिन गाण्यावर डान्स करताना या दोन लशी दिसत आहेत. लशींना याप्रकारे नाचताना पाहणं एकदम फनी तर आहेच मात्र, यातून दिलेला लशीकरणाचा संदेश देखील महत्त्वपूर्ण आहे. या व्हिडीओच्या शेवटाला आपल्या जवळच्या लशीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचा संदेश दिला आहे. 

हेही वाचा - मोठी बातमी! देशात रशियाच्या 'स्पुटनिक' लशीला परवानगी

सध्या सोशल मीडियावर रासपुतिन डान्स चँलेजचा धुमाकूळ सुरु आहे. बोनी एम या गायकाच्या गाण्यावर नाचतानाचे अनेक व्हिडीओ सध्या या चॅलेंजमधून व्हायरल होत आहे. केरळ पोलिसांनी देखील याच ट्रेंडचा वापर लशीकरणाच्या जागृतीसाठी वापरला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.