Viral Video : ‘फूलपाडा...’ फक्त एका शब्दाने ९ वर्षांचा शोध संपला; गुगल मॅपच्या मदतीने उलगडला बेपत्ता प्रकरणाचा गुंता

‘Phulpada’ Helps Lucknow Police Trace Missing Woman; ‘फूलपाडा’ या एका शब्दाच्या धाग्यावरून पोलिसांनी गुगल मॅप आणि गुजरात पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशी संपर्क साधला.
Viral Video

Viral Video

esakal

Updated on

गेल्या नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय आईची तिच्या मुलाशी लखनौमध्ये झालेली भेट भावुक करणारी ठरली. २०१७ मध्ये गुजरातमधून बेपत्ता झालेल्या रतन बेन यांचा शोध अखेर लखनौ पोलिसांच्या मदतीने लागला. विशेष म्हणजे, या शोधासाठी पोलिसांना केवळ एका शब्दाचा धागा मिळाला होता. रतन बेन यांनी तुटक शब्दांत ‘फूलपाडा’ एवढेच सांगितले आणि पोलिसांनी गुगल मॅप तसेच गुजरात पोलिसांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले.

‘फूलपाडा’ ठरला महत्त्वाचा धागा

हजरतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालू अड्डा परिसरात काही दिवसांपूर्वी पोलिसांना एक महिला भटकलेल्या अवस्थेत आढळली. त्या अस्वस्थ दिसत होत्या. त्यांना स्वतःचे नाव, पत्ता किंवा कुटुंबीयांची माहिती व्यवस्थित सांगता येत नव्हती.

पोलिसांनी त्यांच्याशी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या वारंवार ‘फूलपाडा’ हा शब्द उच्चारत होत्या. पोलिसांनी या शब्दाचा धागा पकडून गुगल मॅपवर शोध घेतला. गुजरातमधील सुरत येथे ‘फूलपाडा’ नावाचा परिसर असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर लखनौ पोलिसांनी गुजरात पोलिसांशी संपर्क साधला. जुन्या बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्यानंतर २०१७ मध्ये सुरतमध्ये रतन बेन नावाची महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल असल्याचे समोर आले.

Viral Video
India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

व्हिडिओ कॉलवर मुलाने आईला ओळखले

तपास पुढे नेत पोलिसांनी रतन बेन यांचा मुलगा विशाल जयेश भाई याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे आई आणि मुलाचा संवाद घडवून आणण्यात आला. स्क्रीनवर आईला पाहिल्यानंतर विशालला मोठा धक्का बसला. नऊ वर्षांपासून ज्या आईचा शोध सुरू होता, ती सुखरूप असल्याचे त्याला समजले.

यानंतर विशाल गुजरात पोलिसांचे पथक, मित्र प्रवीण आणि एका नातेवाईकासह लखनौला पोहोचला.

पोलीस ठाण्यात आई-लेकांची भावुक भेट

हजरतगंज पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर विशालने आईला पाहिले. आईसमोर येताच तो भावुक झाला आणि त्याने रतन बेन यांना मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू होते. रतन बेन यांनीही मुलाचा हात घट्ट पकडून ठेवला. हा क्षण पाहून पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही भावुक झाले.

कुटुंबातील मृत्यूंमुळे बसला होता मानसिक धक्का

विशालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील काही जवळच्या व्यक्तींच्या सलग निधनामुळे रतन बेन यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर त्यांची प्रकृतीही खालावली होती.

यापूर्वी त्या एकदा घरातून निघून गेल्या होत्या; मात्र त्यांचा शोध लागला होता. मुलाचे लग्न आणि नातवाच्या जन्मानंतर २०१७ मध्ये त्या पुन्हा घराबाहेर पडल्या. त्यानंतर त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

कुटुंबीयांनी गुजरातमधील विविध पोलीस ठाणी, निवारा गृहे आणि नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, तब्बल नऊ वर्षे त्यांचा शोध लागला नाही.

Viral Video
Coastal Road BMW Accident : फ्लायओव्हरवरून थेट खाली कोसळली कार, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा जागीच मृत्यू; काय घडलं?

एका शब्दाने पुन्हा जोडले कुटुंब

अखेर लखनौ पोलिसांना मिळालेल्या ‘फूलपाडा’ या छोट्याशा सुरागाने तपासाला दिशा मिळाली. गुगल मॅप, गुजरात पोलिसांशी समन्वय आणि जुन्या बेपत्ता नोंदींच्या आधारे पोलिसांनी रतन बेन यांच्या कुटुंबाचा शोध घेतला. नऊ वर्षांचा विरह संपल्यानंतर विशाल आपल्या आईला घेऊन सुरतला रवाना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com