टाटांच्या एअर इंडियाला मालदीवची सलामी | Ratan Tata, Air India news updates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India Flight Water Canon Salute
टाटांच्या एअर इंडियाला मालदीवची सलामी | Ratan Tata, Air India news updates

टाटांच्या एअर इंडियाला मालदीवची सलामी

अलीकडेच एअर इंडियाची (Air India) मालकी पुन्हा एकदा रतन टाटांकडे (Ratan Tata) गेली आहे. त्यानंतर आज एअर इंडियाच्या AI-267 या विमानाचं मालदीवमध्ये (Maldives) पाण्याच्या फवाऱ्याने सलामी देऊन स्वागत करण्यात आले. मालदीवने एअर इंडियाच्या विमानाला (Aeroplan) पाण्याच्या फवाऱ्याने सलामी का दिली यामागे एक कारण आहे.

एअर इंडियाच्या विमानाने 21 फेब्रुवारी 1976 रोजी भारतातील त्रिवेंद्रम ते मालदिवमधील माले दरम्यान पहिले उड्डाण घेतले होते. भारत आणि मालदीवमधील एअर इंडियाचे हे पहिले उड्डाण होतं. या घटनेला आज 46 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने एअर इंडियाचं AI-267 विमान माले विमानतळावर पोहोचताच त्याला पाण्याचे फवारे मारून सलामीनं स्वागत केले.

हेही वाचा: Air India : प्रिय प्रवाशांनो! पहिल्या उड्डाणापूर्वी टाटाचा खास संदेश

विमानांना पाण्याच्या फवाऱ्यांनी सलामी का दिली जाते? (Water Canon Salute)-

एखाद्या विमानाला वॉटर सॅल्यूट देणं ही खूप सन्मानाची बाब असते. वॉटर सॅल्यूट सहसा वरिष्ठ पायलट किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या निवृत्तीवेळी तसेच एखाद्या विमानतळावरील तसेच विशिष्ट एअरलाईनच्या पहिल्या किंवा शेवटच्या उड्डाणावेळी तसेच विशिष्ट विमानाच्या पहिल्या किंवा शेवटच्या फ्लाइटच्या वेळी किंवा एखाद्या संस्मरणीय क्षणासाठी दिला जातो. भारतीय हवाई दलातही अशी परंपरा आहे की, जेव्हा जेव्हा एखादे नवीन विमान लष्करात कामाला लागते तेव्हा त्याला वॉटर कॅननची सलामी दिली जाते. अलीकडेच भारतीय वायू सेनेत दाखल झालेल्या राफेल विमानालाही अशाच प्रकारे सलामी दिली जाते.

हेही वाचा: Air India | 5 जी मोबाईल सेवेचा हवाई सेवेला अडथळा

अशी सलामी कशी दिली जाते?

जेव्हा एखादं विमान विमानतळावर पोहोचतं तेव्हा अग्निशमन दलाच्या उपकरणांमधून धावपट्टीच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा वर्षाव करण्यात येतो. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने एक कमान तयार केली जाते आणि त्याखालून विमान नेलं जाते. विमानांचे स्वागत करण्याच्या या परंपरेला 'वॉटर कॅनन सॅल्यूट' म्हणतात. कधीकधी ते इंद्रधनुष्यासारखे दिसते आणि एक आकर्षक दृश्य बनते.

Web Title: Ratan Tata Air India Flight Water Canon Salute Maldives

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..