esakal | 'राहुल गांधी याचं बोलणं त्यांचे मुख्यमंत्रीही गांभीर्याने घेत नाहीत'
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi, Congress, Modi Government

राहुल गांधी यांचे म्हणणं त्यांचे मुख्यमंत्रीच ऐकत नाहीत. याचा अर्थ असाहोतो की, त्यांच्या बोलण्यामध्ये काही वजन नाही किंवा त्यांचे बोलणे मुख्यमंत्री गंभीरतेने घेत नाहीत, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

'राहुल गांधी याचं बोलणं त्यांचे मुख्यमंत्रीही गांभीर्याने घेत नाहीत'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली: केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रसेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीवर प्रश्न उपस्थित केले होते. टाळेबंदी पूर्णपणे अपयशी ठरल्याचं ते म्हणाले होते. यावर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांचे म्हणणं त्यांचे मुख्यमंत्रीच ऐकत नाहीत. याचा अर्थ असाहोतो की, त्यांच्या बोलण्यामध्ये काही वजन नाही किंवा त्यांचे बोलणे मुख्यमंत्री गंभीरतेने घेत नाहीत, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यातील लोकांना बंदी

अमरिंदर सिंह यांनी सर्वात आधी पंजाबमध्ये टाळेबंदी लागू केली होती. राजस्थानमध्ये पण हेच झालं. महाराष्ट्रामध्ये तर पंतप्रधान मोदींच्या बैठकीआधीच 31 मेपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. याचा अर्थ राहुल गांधी यांचे बोलणे त्यांचे मुख्यमंत्रीच गंभीरतेने घेत नाहीत, असं म्हणत रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कोरोना सारख्या महामारीमध्ये सर्व देशाने एकत्र राहिला हवे. राजकारण तर पुन्हाही करता येईल. पण आता सर्वांनी देशासोबत असायला हवे. मात्र राहुल गांधी टाळेबंदीला विरोध करतात. डॉक्टर, कोरोना वॉरियर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या सन्मानासाठी ताली-थाली वाजवण्यालाही विरोध करतात. संपूर्ण देशाने घरामध्ये दिवे लावले, देशांच्या झोपड्य़ांमध्ये सुद्धा दिवे लागले पण राहुल गांधी याला विरोध करतात, असं प्रसाद म्हणाले आहेत.

'लॉकडाउन-5' चा निर्णय कोणाच्या कोर्टात?

रविशंकर प्रसाद यांनी न्यायपालिकेवर दबाव आणल्याचा आरोपही काँग्रेसवर केला आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेचा आम्ही सन्मान करतो. त्यांना हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, न्यायपालिकेला प्रामाणिक आणि स्वतंत्रपणे काम करु द्यायला हवं. न्यायपालिकेवर दबाव यायला नको. पण काही लोक सोशल मीडियावर आपल्या मनाजोगा निकाल येण्याची इच्छा व्यक्त करतात आणि तसा आला नाही तर मोहिम (कॅम्पेन) चालवतात, असंही ते म्हणाले. निवडणुकीत हरलेले लोक वेळोवेळी न्यायालयातून देशाचे राजकारण नियंत्रित करु पाहतात. जे लोक न्यायालयात येतात त्यांनी आपण  काय केलं  तेही सांगावं. मला इथे कोणाचं नाव घ्यायचं नाही पण काही लोक दबावाचं राजकारण करतात हे खरं आहे, असंही प्रसाद म्हणाले आहेत.