RBI कडून HDFC ला पुन्हा झटका; क्रेडिट कार्डसह नव्या डिजीटल सेवांना मनाई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

भारतीय रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेला सल्ला दिलाय की त्यांनी आपल्या डिजीटल 2.0 मोहिमेअंतर्गत सर्वप्रकारच्या घडामोडी थांबवाव्यात.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून खासगी क्षेत्रातील HDFC बँकेला पुन्हा एकदा झटका मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेवर काही बंधने लावून बँकेच्या सर्व डिजीटल सर्व्हिसेसवर रोख लावली आहे. आरबीआयकडून लागू केलेल्या नव्या बंधनामध्ये क्रेडिट कार्ड सेवेचाही समावेश आहे. मात्र ही बंधने कायमस्वरुपाची नाहीयेत. मात्र, गेल्या दोन वर्षांमधील ही तिसरी वेळ आहे जेंव्हा HDFC वर अशाप्रकारे काही बंधने लादण्यात आली आहेत. या बंधनांविषयी माहिती देताना HDFC बँकेने म्हटलंय की, बँकेच्या नव्या डिजीटल सर्व्हिसवर आरबीआयने अस्थायी स्वरुपाची रोख लावली आहे. यामध्ये नवे क्रेडिट कार्ड काढण्यावरही आरबीआयने बंदी घातलीय. 

#DharampalGulati: टांगेवाला ते कोट्यधीश MDH मसालेवाला यांचा प्रवास | MDH | Masala King | Sakal Media

भारतीय रिझर्व्ह बँकेने HDFC बँकेला सल्ला दिलाय की त्यांनी आपल्या डिजीटल 2.0 मोहिमेअंतर्गत सर्वप्रकारच्या घडामोडी थांबवाव्यात. तसेच नवे क्रेडिट कार्ड ग्राहकांना देणे बंद करावे. गेल्या दोन वर्षांत आपल्या इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग आणि पेमेंट युटिलीटी सेवांमध्ये बँकेला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे. 

डिजीटल सेवांना थांबा
HDFC बँकेच्या डिजीटल सर्व्हिसेसमध्ये सातत्याने ग्राहकांना अडचणी येत असल्याने त्रासाला सामोरे जावं लागत होतं. याबाबत आरबीआयने बँकेला कारण विचारलं होतं. HDFC बँकेच्या डेटा सेंटरमध्ये गडबड झाल्याने त्यांचे यूपीआय पेमेंट, एटीएम सर्व्हिसेस आणि कार्डद्वारे होणारे पेमेंट्स थांबले होते. यामुळे ग्राहकांना त्रास सोसावा लागला होता.

हेही वाचा - पंतजली-डाबरसह अनेक कंपन्यांच्या मधात भेसळीचा गोडवा; CSE ने केला दावा

आरबीयने म्हटलं हा तर गंभीर मामला
HDFC बँकेला गेल्या दोन वर्षांमध्ये तिसऱ्यांदा डिजीटल सर्व्हिसेसमध्ये याप्रकारच्या गोंधळाला सामोरे जावे लागले आहे. आरबीआयने म्हटलं होतं की, डेटा सेंटरमध्ये गडबडी आली असेल तर त्याचं कारण स्पष्ट करावं. याच्या उत्तरादाखल HDFC ने म्हटलं होतं की, गेल्या दोन वर्षांत सिस्टीम आणि प्रोसेसमध्ये योग्य सुधारणा केल्या गेल्या आहेत. मात्र आरबीआयने म्हटलं होतं की बँकेच्या या दाव्यानंतरही अडचणी येतच आहेत जे एक गंभीर प्रकरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI asks HDFC Bank to stop digital activities & new credit card to customers