PMC बँकेच्या ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा! RBI ची महत्वाची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pmc bank

PMC बँकेच्या ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा! RBI ची महत्वाची घोषणा

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह (Punjab and Maharashtra Co-operative Bank) अर्थात PMC बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ज्या ग्राहकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते १० वर्षात पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँकेद्वारे घोटाळेग्रस्त पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक अर्थात पीएमसी बँकेच्या संपादनाला सुकर करण्यासाठी आरबीआयने (RBI) हे पाऊल उचलले आहे.

आरबीआयने काय म्हटलं?

आरबीआयने अशी माहिती दिली आहे की, 'हे पाहू शकतो की USFB 1100 कोटी रुपयांच्या फंडसह सेटअप तयार करत आहे. रेग्युलेटरी नियमांनुसार स्मॉल फायनान्स बँकांसाठी केवळ 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ड्राफ्ट स्कीमअंतर्गत, 1900 कोटी रुपयांचे इक्विटी वॉरंट आहे, जे 8 वर्षांच्या कालावधीत कधीही वापरले जाऊ शकते. हे इक्विटी वॉरंट युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला 1 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. आरबीआयने या मसुद्यावर 10 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या किमतींत घट सुरुच

या मसुद्यानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वे यूएसएफबीकडे येतील. यामध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांना पैसे परत करणे देखील समाविष्ट आहे. अशा अटी युएसएफबी सोबतच्या विलीनीकरणाच्या करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या पैशाचे रक्षण करता येईल.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना कधी मिळणार पैसे?

ज्या ग्राहकांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते १० वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. आरबीआयच्या मसुद्याच्या योजनेनुसार, युएसएफ बँक ठेवीदारांना पाच लाख रुपयांची हमी रक्कम देईल. त्यानंतर, बँक दोन वर्षांनी ५०,००० रुपये, तीन वर्षांनी एक लाख रुपये, चार वर्षांनी तीन लाख रुपये, पाच वर्षांनी ५.५ लाख रुपये आणि १० वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल.

सेंट्रम समूह आणि देयक व्यासपीठ असलेल्या भारतपे यांनी एकत्र येत युनिटी स्मॉल फायनान्स बँकेची स्थापना केली असून, तिचे अलीकडेच मुंबईत कालिना, सांताक्रुझ येथे शाखेसह कार्यान्वयनही सुरू झाले आहे. किमान २०० कोटी रुपयांच्या भांडवल असण्याची नियामकांचे बंधन असताना, ही बँक १,१०० कोटी रुपयांच्या भांडवलासह सुरू झाली आहे. तर सप्टेंबर २०१९ रोजी घोटाळा आणि कर्ज वितरणात अनियमिततेचा सुगावा लागताच, रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध आणले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील बहुतांश सदस्य गजाआड असून, बँकेचा कारभाग रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासकाच्या हाती आहे.

हेही वाचा: दीड वर्षानंतर देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या निच्चांकी

या पद्धतीने मिळणार पैसे?

ज्या ग्राहकांचे पैसे PMC बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते 10 वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. RBI च्या ड्राफ्ट स्कीमनुसार, USF बँक ठेवीदारांना 5 लाख रुपयांची गॅरंटिड रक्कम देईल. त्यानंतर, बँक दोन वर्षांनी 50,000 रुपये, तीन वर्षांनी 1 लाख रुपये, चार वर्षांनी 3 लाख रुपये, 5 वर्षांनी 5.5 लाख रुपये आणि 10 वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल.

loading image
go to top