Bus Fire: बसला आग लागण्याची मुख्य कारणे काय? भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी महत्वाचे

भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी बस जळण्याची मुख्य कारणे समजून घेणे महत्वाचे ठरते
Bus Fire
Bus Fireesakal

Fire Alert: नाशिकमध्ये घडलेल्या बस दूर्घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या गंभीर घटनेची संपूर्ण देशात गंभीर चर्चा सुरू आहे. या बस दुर्घनटेमध्ये लहानग्या मुलांपांसून ते मोठ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकांना बस जळाल्याने त्यांचा जीव गमवावा लागला. ही धक्कादायक दूर्घटना माध्यमांवर बघणाऱ्या अनेकांना यावेळी बस जळण्याची नेमकी कारणे काय असाही प्रश्न पडला असेल. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी बस जळण्याची मुख्य कारणे समजून घेणे महत्वाचे ठरते.

बसच्या आत जोडण्यात आलेली अनेक जड उपकरणे आणि इलेक्ट्रिकल अॅक्सेसरीजचा वापर यांचं अनोखं काँबिनेशन असतं. त्यामुळे बसला आग लागण्याचा धोका असतो. नाशिकमध्ये घडलेली भयावह घटना भविष्यात घडू नये म्हणून अशा घटना रोखण्यासाठी पूर्वतयारीचे नियोजन करणे महत्वाचे ठरते. बसला आग लागण्याची कारणे मुख्यत: तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मोडतात.

1) इलेक्ट्रिकल किंवा चाकांच्या पातळीवरील घर्षाणात वाढ

2) इंजिन घटकात बिघाड असल्यामुळे

3) स्फोटकजन्य घटक बसमध्ये निष्काळजीपणाने बाळगल्यास

Bus Fire
Nashik Bus Accident: बसच्या खिडकीतून उडी मारत वाचवला जीव; प्रवाश्यांनी सांगितला थरारक अनुभव

बऱ्याच घटना या सुधारित देखभाल आणि पूर्वतपासणी केल्यास टाळता येऊ शकतात. तसेच बस प्रवासासाठी सज्ज करण्याआधी बसची अवस्था कशी आहे. त्यातील सगळी उपकरणे नीट आहेत की नाही हे सगळं बस संबंधित कर्मचाऱ्यांनी आधीच तपासणे महत्वाचे ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com