चिकनच्या भावात विक्रमी घसरण;अनेक ठिकाणी व्यापारपेठा बंद

वृत्तसंस्था
Saturday, 9 January 2021

या संसर्गामुळे अनेक शहरांमध्ये चिकनचे भाव कोसळले असून ते ३० ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे.

नवी दिल्ली - देशातील सहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाने हातपाय पसरल्याने यंत्रणा सावध झाली आहे. या संसर्गामुळे अनेक शहरांमध्ये चिकनचे भाव कोसळले असून ते ३० ते ५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत. अनेक भागांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून चिकन मार्केट बंद करण्याचा निर्णय यंत्रणेने घेतला आहे.

Farmer Protest: सुप्रीम कोर्टात जाणार नाही म्हणत शेतकऱ्यांचा 'जिंकू किंवा...

मध्यप्रदेशात पक्ष्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतर इंदूर, उज्जैन या शहरांतील चिकनची दुकाने बंद करण्यात आली आहेत. जयपूर, अजमेर, रांची आणि वाराणसीसह अनेक शहरांतील चिकन आणि अंडी यांच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे.

फेसबुकने Like बटण हटवलं; पब्लिक पेजच्या डिझाइनमध्ये केला बदल

झारखंड सरकारने परराज्यांतून पक्षी आणण्यास मनाई केला असून उत्तरप्रदेशात चिकनचे दर २० रुपयांपर्यंत खाली आल्याने विक्रेत्यांची चिंता वाढली आहे. हिमाचल प्रदेशात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Record fall in chicken prices due to bird flu;Bird flu infection in six states of the country