
दिल्लीत उष्णतेचा कहर! एप्रिल ठरला 72 वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना
नवी दिल्ली : दिल्लीसह भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, राजधानी दिल्लीत 72 वर्षातील दुसरा सर्वात उष्ण महिना एप्रिल महिन्याची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिना दिल्लीत 72 वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे. (Heat Wave In Delhi)
हेही वाचा: MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला
यूपी, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह उत्तर-पश्चिमी राज्यांमध्येही हीच स्थिती असून, मे महिना सुरू व्हायला अजून काही दिवस शिल्लक आहे. मात्र, त्या आधीच देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. राजधानी दिल्लीत एप्रिल महिन्यातील उष्णतेने 72 वर्षांचा विक्रम मोडला असून, 1950 नंतर दिल्लीत एप्रिल महिन्यात एवढी उष्णता जाणवण्याची ही दुसरी वेळ असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी एप्रिल 2010 मध्ये उष्णतेही तीव्र लाट आली होती.
हेही वाचा: बोरिस बेकर यांना अडीच वर्षाचा तुंरगवास; संपत्ती लपवणे आले अंगलट
वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिल्लीसह वायव्य राज्यांमध्ये यंलो अलर्ट जारी केला आहे. याआधी गुरुवारी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, येत्या 5 दिवसांत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, यूपी आणि राजस्थानमध्ये देखील वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे, देशातील कोळसा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 657 मेल/एक्स्प्रेस/पॅसेंजर ट्रेन सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमधून कोळशाच्या रेकचा राज्यांमध्ये पुरवठा केला जाणार आहे.
Web Title: Record Heat Wave In India Second Hottest April In 72 Years In Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..