Delhi Mumbai expressway: दिल्ली ते मुंबई प्रवास फक्त 12 तासात! एक्स्प्रेसवेचे कधी होणार उद्घाटन?

Travel from Delhi to Mumbai in just 12 hours: Delhi Mumbai Expressway!
Delhi Mumbai expressway
Delhi Mumbai expresswayEsakal

नवी दिल्ली- देशातील शहरांना जोडण्यासाठी मोदी सरकारने मोठ्या योजना हाती घेतल्या आहेत. याच योजनेंतर्गत देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांमधील प्रवास वेळ केवळ १२ तासांवर येणार आहे. माहितीनुसार, दिल्ली-मुबंई १,३८६ किलोमीटरचा एक्स्प्रेसवे फेब्रुवारी २०२४ मध्ये बनून तयार होईल.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे दिल्ली, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांना जोडणार आहे. १ लाख कोटींचा खर्चातून हा प्रकल्प उभा केला जाणार आहे. एक्स्प्रेसवे बनून तयार झाल्यानंतर दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. मुंबईवरुन दिल्लीला पोहचण्यासाठी केवळ १२ तासांचा वेळ लागेल. तसेच दोन शहरांमधील अंतर २०० किलोमीटरने कमी होईल.

Delhi Mumbai expressway
Copyright:रामायण किंवा भगवद्‌गीतेवर कॉपीराईट लागतो का?; दिल्ली हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय

मध्य प्रदेशातून जाणारा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे मोदी सरकारसाठी एक महत्त्वाचा पोजेक्ट असल्याचं मानलं जातं. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या एक्स्प्रेसवेचे उद्घाटन भाजपला फायद्याचे ठरणार आहे. (travel time between national capital Delhi and financial capital Mumbai to just 12 hours)

२४६ किलोमीटरचा सोहना-दोसा-लालसोट एक्स्प्रेसवेचे उद्घाटन १२ फेब्रुवारीला झाले होते. १२,१२० कोटींच्या खर्चातून हा रस्ता बांधण्यात आले आहे. या एक्स्प्रेसवेमुळे दिल्ली जयपूर प्रवास वेळ जवळपास साडेतीन तास झाला आहे. याआधी यासाठी पाच तासांचा वेळ लागायचा.

Delhi Mumbai expressway
Delhi HC : वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसाठी 'दिल्ली दर्शन' बसची व्यवस्था करा; हायकोर्टाचे FIR रद्द करताना आरोपींना निर्देश

दिल्ली-वडोदरा एक्स्प्रेसवेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार आहे. या मार्गामुळे दिल्ली-वडोदरा प्रवासाचे अंतर फक्त १० तासांवर येणार आहे. मुंबई सेंट्रलची तेजस राजधानी ही दिल्ली आणि वडोदरा यांना जोडणारी सर्वात जलद रेल्वे आहे. ही रेल्वे १० तास ४५ मिनिटात हे अंतर पार करते. नवा एक्स्प्रेसवे देखील याच वेळेत दिल्ली-वडोदरा प्रवासासाठी वेळ घेईल.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेसवेमुळे ३२० दशलक्ष्य लिटर इंधनाची बचत होईल. तसेच ८५० दशलक्ष्य किलो CO2 उत्सर्जन कमी होईल. ४० दशलक्ष्य वृक्ष लावण्याच्या ते बरोबर आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com