शाकाहारी व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

शाकाहारी व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका फारच कमी असतो, असे एका ताज्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इन्स्टिट्यूट ऑफ झिनोमिक्‍स अँड इंटिग्रेटिव बायॉलॉजी (आयजीआयबी), दिल्ली या संस्थेच्या ४० शाखांनी देशातील १०,४२७ प्रौढ नागरिकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ऑनलाईन सर्वेक्षण केले व त्याचे निष्कर्ष आज जाहीर केले.

नवी दिल्ली - शाकाहारी व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका फारच कमी असतो, असे एका ताज्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इन्स्टिट्यूट ऑफ झिनोमिक्‍स अँड इंटिग्रेटिव बायॉलॉजी (आयजीआयबी), दिल्ली या संस्थेच्या ४० शाखांनी देशातील १०,४२७ प्रौढ नागरिकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ऑनलाईन सर्वेक्षण केले व त्याचे निष्कर्ष आज जाहीर केले. धूम्रपान करणारांनादेखील कोरोनाची लागण तुलनेने कमी होते, असेही हे सर्वेक्षण सांगते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना महामारीला हरविणाऱ्या भारतीयांची संख्या वाढता वाढता एक कोटीच्या पुढे गेली असतानाच हेही सर्वेक्षण समोर आले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात वेगवेगळ्या रक्तगटाचे, व्यवसायांचे, वैद्यकीय व अन्य क्षेत्रांचे, दारू सिगारेटचे व्यसनाधीन असलेले अशा अनेक गटातल्या नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले होते व महिनाभराच्या अंतराने त्यांचे दोनदा त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली.

शाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार? केंद्र सरकारने केला खुलासा

कोरोना हा श्‍वनसनरोग असला तरी धूम्रपान करणारांमध्येही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता कमी असते, असे इटली, न्यूयॉर्क व चीनमधील यापूर्वीच्या काही संशोधनांत स्पष्ट झाले होते. ज्या १०,४२७ जणांचे सर्वेक्षण केले त्यातील १०५८ लोकांच्या शरीरात (१०.१४ टक्के) नव्या कोरोना विषाणूशी लढण्यासाठीच्या अँटीबॉडीजही तयार झाल्याचे तर ३४६ जणांच्या शरीरात प्लाझ्माचे प्रमाण कमी आढळले मात्र त्यांच्या अँटीबॉडीजचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले. 

Video: बायकोला किस करायची पण पंचाईत झालीय; बड्या नेत्याचं भर सभेत वक्तव्य

गेल्या २४ तासांत -
नवे रूग्ण १४ हजारांहून कमी व मृत्यू १४५ 
(गेल्या ८ महिन्यांतील सर्वांत कमी आकडा)

संसर्गाची सद्यस्थिती ताजी आकडेवारी 

  • १,०५,७१,७७३ एकूण रूग्ण 
  • १,०२,११,३४२ बरे झालेले
  • ९६.५९ टक्के रिकव्हरी दर

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduces the risk of corona for vegetarians