Isha Ambani: कोट्यावधींची डील करणाऱ्या ईशाच्या शाही लग्नाची प्लानिंग कोणी केली माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Isha Ambani

Isha Ambani: कोट्यावधींची डील करणाऱ्या ईशाच्या शाही लग्नाची प्लानिंग कोणी केली माहितीये?

Isha Ambani: ईशा अंबानी परत एकदा बिजनेस वर्ल्डमध्ये चर्चेत आली आहे. नुकतीच तिने जर्मनीची कंपनी मेट्रो कॅरी अँड कॅरी इंडिया लिमिटेड टेक ओव्हर केलीय. माहितीनुसार रिलांयस रिटेलचा कार्यभार सांभाळणाऱ्या ईशाने ही डील 2850 कोटींमध्ये क्लोज केलीय.

कोट्यावधींची कंपनी टेकओव्हर करणाऱ्या नीता अंबानीच्या लाडक्या कन्या ईशा अंबानीच्या लग्नातही कोट्यावधींचाच खर्च झालेला. रॉयल टच देणाऱ्या तिच्या वेडिंगचा प्लान कोणी केला होता याची कल्पना तुम्हाला आहे काय? ईशाच्या लग्नाची देश विदेशात चर्चा झाली होती.

देश-विदेशातील दिग्गज पाहुणे बनून ईशाच्या लग्नात सहभागी झाले होते. अनेकांनी या लग्नात भारतीय वेशभूषेत कपडे घालण्यास पसंती दर्शवली होती. निता अंबानी यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात कुठलीच कसर सोडली नाही. निताचा लेहेंगा फेमस डिझायनर अबू जानी संदीप खोसलाने एक्सक्लूझिवली डिझाइन करून घेतला होता.

सोळा पॅनल घागऱ्यात ऑफ व्हाईटचे दोन शेड्स घालण्यात आले होते. या घागऱ्यावरील ओढणी फारच खास होती. ही ओढणी निता अंबानीच्या लग्नाच्या साडीतून घेण्यात आली होती.

ईशाने तिच्या रिसेप्शनमध्येही खास लेहेंगा घातला होता. हा लेहेंगा तिच्यासाठी खास भारतीय नव्हे तर इयालियन फॅशन हाउस वॅलेंटिनोने तयार केला होता. गोल्ड आणि सिल्वर मोटिफने सजलेल्या या लेहेंग्यात ईशा स्टनिंग दिसत होती.

हेही वाचा: Wedding Ceremony : लग्नाचा खर्च केला शिक्षण संस्थेला दान; या विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा

ईशा अंबानीच्या रॉयल वेडिंगची प्लानिंग कोणी केली?

ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या रॉयल वेडिंगची प्लानिंग कंपनी सेवन स्टेप्सने केली होती. 2018 मध्ये पार पडलेल्या या सोहळ्याची चर्चा आजही देशविदेशात चाललेली दिसून येते.