Reliance Investment : ममतादिदींच्या प. बंगालमध्ये मुकेश अंबानी करणार वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणुक, केली मोठी घोषणा

ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांत केली जाणार आहे
Mamatadidi's W. Mukesh Ambani will invest twenty thousand crore rupees in Bengal
Mamatadidi's W. Mukesh Ambani will invest twenty thousand crore rupees in BengalEsakal

कोलकता : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांत केली जाणार आहे. कोलकता येथे सुरू असलेल्या सातव्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये मुकेश अंबानी म्हणाले, की “रिलायन्सने बंगालमध्ये आतापर्यंत सुमारे ४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही पुढील तीन वर्षांत २० हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहोत.

Mamatadidi's W. Mukesh Ambani will invest twenty thousand crore rupees in Bengal
Parenting Tips : वारंवार समजावून देखील मुले वाद घालतात?मग, 'या' ट्रिक्सचा वापर करून मुलांना लावा वळण

ही गुंतवणूक टेलिकॉम, रिटेल आणि बायो एनर्जी क्षेत्रात केली जाणार आहे. फाइव्ह-जी राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात नेत आहोत, विशेषत: ग्रामीण बंगालला जोडले जात आहे. आम्ही बंगालचा बहुतांश भाग व्यापला आहे. जिओ च्या नेटवर्कमध्ये राज्यातील ९८.८ टक्के लोकसंख्या व कोलकता टेलिकॉम सर्कलमधील १०० टक्के लोकसंख्या समाविष्ट आहे. जिओचे मजबूत नेटवर्क पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगारासह शिक्षण, आरोग्यसेवा आणि शेतीला चालना देईल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com