उद्धव ठाकरेंना दिलासा! शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय सुप्रीम कोर्टातच होणार?

धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत उद्धव ठाकरेंनी भीती व्यक्त केली असून पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Supreme Court Latest News
Supreme Court Latest NewsSupreme Court Latest News

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग सुनावणी घेण्याची भीती उद्धव ठाकरेंना असल्यानं त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सुनावणीवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या या भीतीवर सुप्रीम कोर्ट निरिक्षण नोंदवणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे गटासाठी हा दिलासा मानला जात आहे. (Relief to Uddhav Thackeray Shiv Sena party symbol may be decided in SC not in EC)

Supreme Court Latest News
काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग? दोन काश्मिरी हिंदूंची दहशतवाद्यांकडून हत्या

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाच्या भीतीवर निरिक्षण नोंदवणार असलं तरी यापूर्वीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगानं यासंदर्भत कोणताही निर्णय घेऊ नये, असं म्हटलं होतं. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून असा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही, असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेनेला वाटत असलेली भीती ही अनाठायी असल्याचं त्यांचं मत आहे.

Supreme Court Latest News
ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; सहा जवान शहीद

दरम्यान, शिवसेनाच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांकडून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. या याचिकांवर पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. पण तत्पूर्वी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक आयोग शिवसेनेचं पक्ष चिन्ह धनुष्यबाणाबाबत निर्णय देऊ शकते, अशी भीती उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com