Yogi Adityanath : ''धार्मिक व्यक्ती सत्तेत असेल तर चांगले परिणाम दिसून येतात'', न्यायाधीशांकडून योगी आदित्यनाथांचं कौतुक

Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशातल्या बरेली येथील अतिरिक्त सेशन कोर्टाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं तौंडभरुन कौतुक केलं. ते म्हणाले की, जेव्हा एखादा धार्मिक व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्यांचे चांगले परिणाम दिसून येतात. याचं उदाहरण देताना त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचा दाखला दिला.
Yogi Adityanath
Yogi AdityanathYogi Adityanath

Yogi Adityanath News : उत्तर प्रदेशातल्या बरेली येथील अतिरिक्त सेशन कोर्टाचे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं तौंडभरुन कौतुक केलं. ते म्हणाले की, जेव्हा एखादा धार्मिक व्यक्ती सत्तेच्या खुर्चीवर बसतो तेव्हा त्यांचे चांगले परिणाम दिसून येतात. याचं उदाहरण देताना त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचा दाखला दिला.

न्यायाधीशांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना तत्वज्ञ प्लेटो यांच्याशी केली. सत्तेचा प्रमुख हा धार्मिक असावा. कारण धार्मिक व्यक्तीचे जीवन हे आनंदाचे नसते तर त्यागाचे आणि समर्पणाचे प्रतिक असते.. असं प्लेटो यांचं तत्त्वज्ञाना सांगतं.

Yogi Adityanath
Ravichandran Ashwin IND vs ENG : आता लोक काय म्हणतील याची भीती नाही... अश्विन 100 व्या कसोटीनंतर असं का म्हणाला?

न्यायाधीश पुढे म्हणाले की, सिद्धपीठ गोरखनाथ मंदिराचे पीठाधीश्वर महंत योगी आदित्यनाथ, जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे तत्त्वज्ञान सिद्ध केलं आहे.

'लाईव्ह लॉ' या वेबसाईटच्या हवाल्याने लाईव्ह हिंदुस्थानने हे वृत्त दिले आहे.

बरेली येथे झालेल्या जातीय हिंसाचाराप्रकरणी मुस्लिम धर्मगुरु मौलाना तौकीर रझा खान यांना समन्स बजावताना न्यायमूर्ती दिवाकर यांनी ही टिपण्णी केली आहे. दंगलीमागच्या सूत्रधाराला यापूर्वी देशात क्वचितच शिक्षा झाली असेल. जर युपीमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार नसते तर आरोपी मौलाना तौकीरने बरेलीमध्ये आणखी दंगल भडकवली असती, अशी टिपण्णी त्यांनी केली.

Yogi Adityanath
Himachal Pradesh : 11 आमदार हिमाचलमधून उत्तराखंडला पोहोचले; काँग्रेसचं संकट संपलं नाही...

न्यायाधीश दिवाकर यांनीच २०२२ मध्ये ज्ञानवापी मशीद परिसराची व्हिडीओग्राफी करण्याचे निर्देश दिलेले होते. आपण दिलेला निर्णय हा कायद्यानुसारच होता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यांनी आपल्या कुटुंबाबात चिंता व्यक्त केली. ''माझ्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे, ते मी शब्दांमध्ये मांडू शकत नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुरक्षिततेची चिंता आहे. माझी आईदेखील माझ्या सुरक्षिततेबद्दल चिंतीत असते.'' असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com