निवडणूक आयोगावर मद्रास हायकोर्टाची टिप्पणी चुकीची - SC

Supreme-Court
Supreme-Court
Summary

सर्वोच्च न्यायालयाने मद्रास हायकोर्टाला निवडणूक आयोगाबाबत केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर खूनाच्या गुन्ह्याबाबत टिप्पणी केली होती.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मद्रास हायकोर्टाला (Madras High court) निवडणूक आयोगाबाबत (Election Commission) केलेल्या विधानावरून फटकारलं आहे. मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगावर खूनाच्या गुन्ह्याबाबत टिप्पणी केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने केलेलं हे विधान अत्यंत चुकीचं होतं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. मद्रास उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेलं वक्तव्य हा निकालाचा भाग नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या याचिकेवर आदेश देण्यास नकार दिला. न्यायालायने म्हटलं की, न्यायाधीशांनी संयम बाळगण्याची गरज आहे. न्यायालयीन कामकाजामध्ये कठोर वक्तव्ये करण्याची गरज नाही. (remarks-by-madras-hc-on-ec-harsh-says-sc)

न्यायालयीन कामकाजाच्या रिपोर्टिंगबाबत सर्वोच्च न्यायालायने म्हटलं की, माध्यमांना न्यायालयीन कामकाजाबद्दल मत व्यक्त करणं आणि लिहिण्याचा अधिकार आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात माध्यमांना रोखणं न्यायापालिकेसाठी चांगलं असणा रनाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती सर्वत्र पोहोचत असताना न्यायालयाने आपण वापरत असेलेल्या भाषेबाबत जागरुक असायला हवं. त्याकडे लक्ष द्यायला हवं. आपली भाषा जीवनात इतरांशी असलेले संबंध कायम ठेवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

Supreme-Court
दिल्लीवासीयाच्या नजरेतून ‘कोरोनानुभव’

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे महत्त्व, त्यांची जबाबदारी आणि त्याच्या कामकाजाचं कौतुक केलं. तसंच म्हटलं की, निवडणूक आयोगाची तक्रार तशी उच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर नाही. त्यामुळे आयोगाच्या याचिका निकालात काढली. जी गोष्ट रेकॉर्डवर नाही ती डिलिट किंवा रिमूव्ह करण्याचा काहीच अर्थ नाही. तसंच बोलण्याचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य माध्यमांना आहे.

काय म्हणालं होतं मद्रास हायकोर्ट

अवघा देश कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या तीव्र लाटेला सामोरे जात असून त्यासाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे. तुमच्यावरच खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा. कोरोनाविषक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जायला हवे. त्या नियमांची ब्लूप्रिंट आम्हाला सादर करा अन्यथा आम्ही मतमोजणी थांबवू असा निर्वाणीचा इशारा देखील न्यायालयाने दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com