
कोलकता - भारतीय जनता पक्षावरून पश्चिम बंगालमधील रणधुमाळीत आणखी एक नाट्य घडले आहे, जे प्रत्यक्ष नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून एका कलावंताला नाटकातूनच काढून टाकण्यात आले. कौशिक कर असे या कलावंताचे नाव आहे. सौरव पालोधी याच्या इच्छेमोटो या नाट्यसंस्थेने त्याला ‘घुम नेई’या नाटकात भूमिका करण्यासाठी आमंत्रित केले होते. ही नाट्यसंस्था सामाजिक-आर्थिक विषयांवर कलाकृतींची निर्मिती करते. महान कलावंत उत्पल दत्त यांनी १९७०च्या दशकात लिहिलेल्या नाट्यसंहितेवर ‘घुम नेई’ आधारित आहे. देशातील सध्याच्या राजकीय स्थितीविषयी डाव्या विचारसरणीच्या दृष्टिकोनाचा त्यात ऊहापोह आहे.
दिग्दर्शक असलेल्या सौरवने तीन दिवसांपूर्वी फेसबुकवरील आपल्या अधिकृत अकाऊंटवर बंगाली भाषेतून पोस्ट लिहून ही माहिती दिली. २०१९ मध्ये कौशिकला या भूमिकेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. नाटकातील कौशिकच्या व्यक्तिरेखेचे नाव २०१५ मधील दादरी प्रकरणाशी संबंधित आहे. गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. त्याचाही संदर्भ या व्यक्तिरेखेशी आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एकतर्फी निर्णय
कौशिकने हा एकतर्फी निर्णय धक्कादायक असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, डाव्यांच्या फॅसिस्टवादी वृत्तीचे हे उदाहरण आहे.ते प्रागतिक सांस्कृतिक चळवळीच्या इतिहासाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करतात, असे तो म्हणाला.
भाजपमध्ये गेल्याचे कारण पुरेसे
सौरव डाव्या विचारसरणीचा मानला जातो. त्याने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, -घुम नेई-मधून आम्ही कौशिकला तातडीने काढून टाकत आहोत. सध्याच्या परिस्थितीत तो भाजपमध्ये गेल्याचे कारण पुरेसे आहे. श्रमजीवी वर्गासाठीच्या नाटकात जातीयवादी घटकांना कोणतेही स्थान असू शकत नाही. या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. याचे कारण मुळात हे नाटक भाजप विचारसरणीच्या विरोधात आहे आणि या पक्षाशी संबंधित असलेली एखादी व्यक्ती त्यात सहभागी होऊ शकत नाही.
नामवंत दिग्दर्शकाची भूमिका
या नाटकाशी संबंध नसलेले नामवंत दिग्दर्शक कमलेश्वर मुखर्जी यांनी सांगितले की, माझ्यापुरते बोलायचे कलाकारांच्या निवडीवर मी कुणाच्याही राजकीय विचारसरणी किंवा रंग याचा कधीही परिणाम होऊ देत नाही.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.