तामिळनाडूत दह्याच्या पाकिटावरुन पेटला भाषेचा वाद! काय घडलाय प्रकार वाचा Tamil Nadu Curd Controversy

Tamil Nadu Curd Controversy
Tamil Nadu Curd Controversyesakal

देशात हिंदी आणि तमिळ भाषेबाबत वाद आहेत आणि तो आता प्रत्येक गोष्टीत पाहायला मिळत आहे. त्याला कारण ठरलं आहे ते दही. दह्याच्या पॅकेटावर हिंदीत 'दही' असे नाव लिहिल्याने वाद निर्माण झाला आहे. हा वाद इतका वाढला आहे की देशाच्या अन्न सुरक्षा प्राधिकरणाला (FSSAI) या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. FSSAI ने अखेर गुरुवारी आपले निर्देश मागे घेतले आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनपासून ते राज्यातील दूध उत्पादकांपर्यंत हिंदी लादल्याचा आरोप केला होता.

Tamil Nadu Curd Controversy
राहुल गांधी प्रकरणात नवा ट्विस्ट; वकील कपिल सिब्बल यांची महत्त्वाची माहिती

या प्रकरणी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अन्न सुरक्षा प्राधिकरणावर हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप केला होता. याशिवाय तामिळनाडूच्या दूध उत्पादक संघ अवीननेही FSSAI च्या नियमांना विरोध केला आहे. संघाने 'दही' या हिंदी शब्दाऐवजी तामिळ शब्द 'थायिर' पॅकेटवर लिहिणार असल्याचे म्हटले आहे.

तामिळनाडूचे दुग्ध विकास मंत्री एसएम नासर यांनी सांगितले की, सरकारला एक पत्र प्राप्त झाले आहे, ज्यामध्ये हिंदी आणि तामिळ भाषेच्या वाढत्या दरीमध्ये ऑगस्टपूर्वी निर्देश लागू करण्यास सांगितले आहे. हिंदीबद्दल तिरस्कार व्यक्त करत मंत्री नासर म्हणाले की, राज्यात हिंदीला स्थान नाही.

Tamil Nadu Curd Controversy
Indore Temple Accident: इंदूरमधील मंदिर दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, सरकारकडून मदत जाहीर

FSSAI ने समस्या कशी सोडवली?

हा वाद सोडवण्यासाठी FSSAI ने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात संस्थेने म्हटले आहे की, “फूड बिझनेस ऑपरेटर्स (FBOs) ला आता लेबलवर ‘दही’ हा शब्द कंसात इतर कोणत्याही प्रचलित प्रादेशिक सामान्य नावासह वापरण्याची परवानगी आहे. उदाहरणार्थ, 'दही (दही)' किंवा 'दही (मोसरू), 'दही (जम्मतदौद)', 'दही (थायिर)', 'दही (पेरुगु)' वापरू शकतात.

तामिळनाडू दूध उत्पादक महासंघाच्या निषेधामुळे या प्रकरणाचा वाद सुरू झाला. FSSAI ने दह्याच्या पॅकेटमध्ये हिंदी भाषेत 'दही' लिहिण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एफएसएसएआयवर हिंदी भाषा दडपल्याचा आरोप केला होता, तो सोडवण्यासाठी FSSAI नेआपला निर्णय मागे घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com