Republic Day 2023 : लष्करातून राजीनामा देत बनले राष्ट्रपती, कोण आहे प्रजासत्ताक दिनाचे खास पाहुणे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यात बुधवारी विस्तृत चर्चा झाली
Republic Day 2023
Republic Day 2023 esakal

Republic Day 2023 : आज प्रजासत्ताक दिवस आहे. भारतासाठी हा दिवस खास आहे.दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या खास कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांचं आगमन असते. यावर्षी प्रजासत्ताक दिनाला पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे भारतात तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी दाखल झाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यात बुधवारी विस्तृत चर्चा झाली.

या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंनी अनेक क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करार केले जातील अशी अपेक्षा आहे.तेव्हा आज आपण प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या इजिप्तच्या राष्ट्रध्यक्षांबाबत जाणून घेऊया.

अब्देल फतेह अल-सिसी हे मिस्रचे सोळावे राष्ट्राध्यक्ष आहेत.2014 पासून ते सतत राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत.2018 मधे त्यांनी राष्ट्रपतीच्या इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. मार्चमधे 2018 मधे राष्ट्रपती निवडणूकीत ते 97 टक्के मतांनी निवडून आले.भारतातला त्यांचा दौराही महत्वपूर्ण ठरणार आहे.

अल सिसींचा जन्म 1954 मध्ये कैरो येथे झाला. तरुण असताना, ते इजिप्शियन सैन्यात सामील झाले आणि इजिप्शियन आर्मीच्या कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी सौदी अरेबियामध्ये पद भूषवले. सिसी यांनी 1992 मध्ये युनायटेड किंगडममधील जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेजमध्ये आणि 2006 मध्ये पेनसिल्व्हेनियाच्या कार्लिले येथील युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेजमध्ये अतिरिक्त प्रशिक्षण घेतले. 2010 मध्ये मिलिटरी इंटेलिजन्सचे संचालक होण्यापूर्वी त्यांनी mechanized infantr commander म्हणून काम केले.

लवकरच इजिप्त भारताकडून संरक्षण उपकरणे आणि युद्ध विमाने खरेदी करणार आहे

कोविडनंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार झपाट्याने वाढला आहे. 2021-22 या वर्षात त्यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 7.26 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 75 टक्के अधिक आहे. यामध्ये भारताची निर्यात ३.७४ अब्ज डॉलर होती.

Republic Day 2023
Republic Day : सहा जणांना कीर्ती चक्र तर १५ जणांना शौर्य चक्रे; ९२ जणांना सेनापदके

दोन्ही देशांनी 2026-27 पर्यंत 12 अब्ज डॉलर्स द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय कंपन्यांनीही इजिप्तमध्ये ३.३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. इजिप्तही सुएझ कालव्याचा विस्तार करत असून भारत त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com