टाटा सन्सची होणार एअर इंडिया; अंतिम हस्तांतर याच आठवड्यात!

हस्तांतराची अंतिम मुदत निश्चित झालेली नाही
एअर इंडिया पुन्हा ‘टाटां’कडे झेपावेल!
एअर इंडिया पुन्हा ‘टाटां’कडे झेपावेल!sakal news

प्रजासत्ताक दिनानंतर (२६ जानेवारी) (Republic Day) कोणत्याही दिवशी टाटा सन्सला (Tata Sons) एअर इंडियाचे हस्तांतरण केले जाऊ शकते. यासंबंधी अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये बोली लावल्यानंतर टाटा सन्स पुन्हा एकदा एअर इंडियाचे संचालन करणार आहे. टाटा ग्रुपमध्ये स्वातंत्र्यापूर्वी टाटा एअरलाइन्स म्हणून १९३२ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर १९५३ मध्ये त्याचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या अंतर्गत संदेशात त्यांना सोमवारपर्यंत क्लोजिंग बॅलन्स शीट सादर करण्यास सांगितले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर ताळेबंद टाटा सन्सकडे (Tata Sons) पुनरावलोकनासाठी पाठवायचा आहे. अशा स्थितीत गुरुवारपर्यंत विमान कंपनी नवीन मालकाकडे सोपवली जाईल (Hand Over in this week), अशी अपेक्षा आहे.

एअर इंडिया पुन्हा ‘टाटां’कडे झेपावेल!
‘विवस्त्र डान्स’ प्रकरण : पोलिसांनी केली दहा जणांना अटक

२० जानेवारीपर्यंतची क्लोजिंग बॅलन्स शीट २४ जानेवारीला टाटाद्वारे पुनरावलोकनासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. टाटाद्वारे याचे तपासणी करून काही बदल असेल तर बुधवारपर्यंत केले जातील. मेसेजमध्ये एअरलाइन्सच्या (Air India) कर्मचाऱ्यांना असेही सांगण्यात आले आहे की ते पुढील तीन दिवस खूप व्यस्त असतील आणि त्यांना या कालावधीत सर्वोत्तम देण्याची विनंती करण्यात आली आहे.

अंतिम हस्तांतर याच आठवड्यात!

हस्तांतराची अंतिम मुदत निश्चित झालेली नाही. परंतु, गुरुवारपर्यंत विमान कंपनी टाटा सन्सकडे (Tata Sons) सोपवण्याचे लक्ष्य आहे. आम्ही कोणत्याही तारखेची पुष्टी करू शकत नाही. परंतु, अंतिम हस्तांतर याच आठवड्यात होणार आहे, असे एअर इंडियाच्या (Air India) अधिकाऱ्यांनी सांगितले. या आठवड्यात सर्व हँडओव्हर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चोवीस तास काम करीत आहेत. २६ जानेवारीलाही (Republic Day) काम करावे लागू शकते. जेणेकरून गुरुवारी हस्तांतर (Hand Over in this week) करता येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, एअर इंडियाच्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com