राज्यांतील निर्बंध शिथिल झाल्याने मजुरांची कामावर ‘वापसी’

मुंबई, दिल्ली व अनेक राज्यांतील निर्बंध शिथिल झाल्याने एक-दीड महिन्यांपासून बंद असलेले कारखाने सुरू झाले आहेत.
Worker
WorkerSakal

पाटणा - मुंबई, (Mumbai) दिल्ली (Delhi) व अनेक राज्यांतील निर्बंध शिथिल झाल्याने एक-दीड महिन्यांपासून बंद असलेले कारखाने (Factory) सुरू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेतील (Second Wave) लॉकडाउनमध्ये (Lockdown) गावी गेलेले मजूर कामाच्या शोधात परतू लागले आहेत. (Return of Workers to Work due to Relaxation of State Restrictions)

मुजफ्फरपूरसह उत्तर बिहारमधील अन्य जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या मजुरांना पुन्हा कामावर येण्यासाठी त्यांचे कारखान्याचे किंवा कंपनीचे मालक रेल्वेचे तिकीट देत आहेत. गेल्या काही दिवसांत दररोज मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर मुंबई, दिल्लीसह अन्य राज्यांमध्ये रवाना होत आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचे १०० टक्के आरक्षण झाले असून प्रतीक्षा काळात अचानक वाढ झाली आहे. जयनगरहून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणारी पवन एक्स्प्रेसचे तिकीट गेल्या आठवड्यापर्यंत सहज मिळत होते, पण सध्या काही मिनिटांतच गाडी ‘फुल’ होत आहे. रेल्वेच्या तत्काळ तिकिटांसाठी लोक रात्रीपासूनच रांगा लावत आहेत.

Worker
वयोवृद्धांपेक्षा तरुण महत्त्वाचे; लसीसंदर्भात कोर्टाचा सल्ला

मालकाकडून बोलावणे

सरैया येथील रहिवासी राम प्रसाद हा २१ वर्षांपासून मुंबईत फरसाण तयार करणाऱ्या कारखान्यात काम करतो. गेल्या वर्षी तो चालत मुजफ्फरपूरला आला होता. दुसऱ्या वेळी जेव्हा कारखाना बंद झाला तेव्हा तो रेल्वेने गावी आला. आता मालक पुन्हा बोलावत असल्याने मुंबईचा रस्ता धरणार असल्याचे त्याने सांगितले. सहरसा, सुपौल, दरभंगा येथून मोठ्या संख्येने मजूर परत जात आहेत.

रोज ५०० मजूर होताहेत रवाना

मुजफ्फरपूर जंक्शन येथून रोज ५०० मजूर रवाना होत आहेत. सीतामढी, शिवहर, मोतिहारीसह अन्य जिल्ह्यांतील मजूर रेल्वेसाठी मुजफ्फरपूर स्थानकावर येत आहेत. काही मजुरांना त्यांच्या कंपनीच्या प्रमुखांची प्रवासासह निवास खर्च देण्याची तयारी आहे. यासाठी कंपन्यांनी अनेक जिल्ह्यांत प्रतिनिधीही पाठविले आहेत. हे प्रतिनिधी सर्व मजुरांना एकाच वेळी परत आणण्यासाठी एकत्र करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com