अमित शहा म्हणतात, इतिहासाचे पुनर्लेखन हवे पण...

पीटीआय
Thursday, 17 October 2019

बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाची आघाडी होणे अटळ असून, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही आगामी निवडणूक लढवू. 

- अमित शहा, अध्यक्ष भाजप 

वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज इतिहासाच्या पुनर्लेखनाचा मुद्दा मांडला. देशाचा इतिहास आता भारताच्या दृष्टिकोनातून लिहायला हवा, असे मत त्यांनी मांडले.

भारतात 1857 मध्ये झालेल्या बंडाला सावरकरांनीच सर्वप्रथम स्वातंत्र्यलढा असे संबोधले होते, असे शहा यांनी नमूद केले. ते येथे बनारस हिंदू विद्यापीठामध्ये आयोजित एका चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी बोलत होते. या चर्चासत्राला देशभरातील इतिहास संशोधक आणि अभ्यासक उपस्थित आहेत.

Vidhan Sabha 2019 : मोदींच्या सभेच्या बंदोबस्ताहून परतणारी पोलिस व्हॅन पलटली

"आपण 1857 च्या उठावाकडे ब्रिटिशांच्या नजरेतून पाहतो. त्यामुळे आपल्याला त्यातील क्रांती दिसत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच त्याला पहिला स्वातंत्र्यलढा असे संबोधले. अन्यथा, आपल्या मुलांना हा इतिहास केवळ बंडाच्या रूपातच दिसला असता. आता कोणावरही दोषारोप न करता भारतीय इतिहासकारांना इतिहासाचे लेखन करावे लागेल. हे सगळे भारताच्या दृष्टिकोनातून व्हायला हवे,'' असे मतही त्यांनी या वेळी मांडले.

Vidhan Sabha 2019 : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक

शहा यांनी या वेळी गुप्तकालीन राजवटीचे कौतुक केले. स्कंदगुप्ताने हुनांच्या विरोधात मोठा लढा दिल्याचा दाखलाही त्यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rewrite of History on Indias Angle says Amit Shah