
पाय नसतानाही चालवतोय तुफान सायकल; IAS अधिकाऱ्याचा व्हिडीओ चर्चेत
2009 बॅचचे IAS अधिकारी अवनीश शरण हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असलेले दिसून येतात. अवनीश आपल्या ट्विटरवर सातत्याने आपले विचार मांडताना दिसून येतात. प्रेरणादायी विचार मांडून अनेकांना ते प्रोत्साहन देतात. नेहमीच चर्चेत असणाऱ्या अवनीश यांनी आता एक असा व्हिडीओ शेअर केलाय, जो पाहून तुम्ही सुद्धा थक्क होऊन जाल. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांना प्रेरणादायी ठरेल असाच आहे, या व्हिडीओ सध्या अनेक लाईक्स, रिट्वीट्स मिळत असून तो मोठ्या प्रमाणावर शेअर होतो आहे.
हेही वाचा: Maharashtra Bandh : दुर्देव आहे माणुसकी राहिलेली नाही - सुप्रिया सुळे
काय आहे व्हिडीओत?
या व्हिडीओत दिसतंय की, एक असा व्यक्ती सायकल चालवतो आहे, ज्याला एक पायच नाहीये. पाय नसताना देखील ही व्यक्ती अत्यंत गतीने सायकल चालवताना दिसून येत आहे. या व्यक्तीला उजवा पाय नसल्याचं दिसतंय. त्यामुळे उजव्या हातात काठी घेऊन ही व्यक्ती पायडल चालवताना दिसत आहे. या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव देखील पाहण्यासारखे आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना IAS अवनीश यांनी 'NEVER GIVE UP' असं लिहलंय.
हेही वाचा: 'फक्त सांगते, सगळे माफिया पप्पू आर्यनच्या पाठीशी'
अवनीश नेहमीच असतात चर्चेत
सोशल मीडियावर सक्रीय असणारे अवनीश अलिकडेच चर्चेत आले होते, ते त्यांच्या मार्क्समुळे...! त्यांनी एक इमेज शेअर केली होती ज्यामध्ये त्यांनी आपले दहावी, बारावी आणि ग्रॅज्यूएशनचे मार्क्स शेअर केले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना दहावीला 44.5 टक्के, बारावीला 65 टक्के आणि ग्रॅज्यूएशनला 60.7 टक्के मार्क्स मिळाले होते. मात्र, UPSC सारख्या परीक्षेत मात्र त्यांनी 77 वी रँक प्राप्त केली होती.
Web Title: Riding A Bicycle Without Legs Video Of Ias Officer In Discussion
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..