'फक्त सांगते, सगळे माफिया पप्पू आर्यनच्या पाठीशी'

काहीही झालं, कुणीही काय म्हणतेय याचा विचार न करता आपलं म्हणणं परखडपणे मांडणारी अभिनेत्री म्हणून कंगनाचं (bollywood actress kangana ranaut ) नाव घ्यावं लागेल.
Aryan Shahrukh Khan
Aryan Shahrukh Khansakal

मुंबई - काहीही झालं, कुणीही काय म्हणतेय याचा विचार न करता आपलं म्हणणं परखडपणे मांडणारी अभिनेत्री म्हणून कंगनाचं (bollywood actress kangana ranaut ) नाव घ्यावं लागेल. बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगनाची ओळख झाली आहे. यापूर्वी तिनं अनेक बॉलीवूड सेलिब्रेटींशी पंगा घेतला आहे. बॉलीवूड क्वीन म्हणूनही तिनं आपलं रोखठोक मत मांडून कित्येकांची नाराजी ओढावून घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्याचे कारण किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला एनसीबीनं अटक केली आहे. तो आता कोठडीत आहे. त्याप्रकरणावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी त्याला आपला पाठींबा दर्शवला आहे. याविषयी कंगनानं नाराजी व्यक्त केली आहे.

कंगनाचा बॉलीवूडच्या खान मंडळीवर पहिल्यापासून राग असल्याचे दिसून आले आहे. तिनं आतापर्यत त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. ती त्यांच्याविरोधात ठामपणे आपली भूमिका मांडताना दिसते. कित्येक मुलाखतीतून तिनं त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी तिच्या थलाईवी चित्रपटावर त्यांच्याकडूनही एक प्रतिक्रिया न आल्यानं तिनं त्यांच्यावर आगपाखड केली आहे. त्यांच्याकडून मला प्रतिक्रियेची अपेक्षा नाही. ते कधीही मोकळेपणानं कुणाचं कौतूक करणार नाही. असं तिनं त्यावेळी सांगितलं होतं. आतापर्यत शाहरुखच्या मुलाला काही सेलिब्रेटींनी आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यात ऋतिक रोशन, सुनील शेट्टी, पूजा भट्ट, शेखर सुमन, फराह खान यांचा समावेश आहे.

कंगनानं सोशल मीडियावरुन या सगळ्यांना ट्रोल केले आहे. तिनं म्हटलं आहे की, मी फक्त सांगते, आता सगळे माफिया पप्पू आर्यन खानला सपोर्ट करण्यासाठी एकत्र आले आहे. कंगनानं सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे त्यामध्ये जॅकी चॅन आपल्या मुलाच्या अटकेवर माफी मागताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर कंगनानं पोस्ट शेयर केली आहे. त्या फोटोमध्ये एका बाजुला जॅकी चॅन आणि दुसऱ्या बाजुला त्याच्या मुलाला पोलीस घेऊन जात आहेत असे दाखवण्यात आले आहे. कंगनानं त्या फोटोला कॅप्शन देताना लिहिलंय की, मी फक्त सांगते...

जॅकी चॅननचा मुलगा 2014 मध्ये ड्रग प्रकरणी अटकेत होता. त्यावेळी त्या अभिनेत्यानं चाहत्यांची माफी मागितली होती. जॅकी म्हणाला होता, मला माझ्या मुलाची लाज वाटते. हे माझं अपयश आहे. मी त्याच्यावर झालेल्या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. त्यानंतर त्याच्या मुलाला सहा महिन्यांची कैद झाली होती. यापूर्वीही कंगनानं आर्यन खानच्या प्रकरणावर टीप्पणी केली होती. जेव्हा ऋतिकनं आर्यनला सपोर्ट केला होता तेव्हा तिनं लिहिलं होतं की, आता सगळे माफिया पप्पू आर्यनच्या बचावासाठी एकत्र आले आहेत.

Aryan Shahrukh Khan
आर्यन खान प्रकरणावर रवीनाची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाली...
Aryan Shahrukh Khan
Drugs Case: अशी होती आर्यन खानची तुरुंगातील पहिली रात्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com