लालूंना मोठा दिलासा, आचारसंहिता भंग प्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांची निर्दोष मुक्तता

Lalu Yadav News
Lalu Yadav Newsesakal
Summary

माजी मुख्यमंत्री लालू यादव यांना न्यायालयानं सहा हजारांचा दंड ठोठावला आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता भंग प्रकरणात RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Yadav News) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. मात्र, न्यायालयानं त्यांना सहा हजार रुपयांचा दंडही ठोठावलाय. आज (बुधवार) बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री या प्रकरणी पलामू येथील विशेष न्यायालयात हजर झाले होते.

झारखंड विधानसभा निवडणूक-2009 (Jharkhand Assembly Election-2009) दरम्यान लालू प्रसाद यादव गढवा विधानसभा मतदारसंघातील (Garhwa Assembly Constituency) आरजेडी उमेदवार गिरीनाथ सिंह यांच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरनं पोहोचले होते. गढवा येथील गोविंद हायस्कूलमध्ये लालूंची सभा होणार होती. हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी गढवा ब्लॉकच्या कल्याणपूरमध्ये हेलिपॅड निश्चित करण्यात आलं होतं. त्यासाठी प्रशासनानं परवानगीही दिली होती. मात्र, हेलिकॉप्टर नेमून दिलेल्या हेलिपॅडवर उतरण्याऐवजी गोविंद हायस्कूलच्या मैदानावरील सभेच्या ठिकाणी उतरलं. यामुळं एकच गोंधळ उडाला.

Lalu Yadav News
देशात मोठ्या आत्मघाती हल्ल्याची शक्यता; 'अल कायदा'ची भारताला थेट धमकी

निवडणूक आयोगानं (Election Commission) लालू यादव यांचं हे पाऊल आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन मानून एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते. यानंतर बरंच राजकारणही झालं. लालूंच्या लोकांनी हेलिकॉप्टरचा मार्ग चुकल्याचं सांगितलं, तर विरोधकांनी लालूंनी गर्दी जमवण्यासाठी हे सर्व केल्याचं म्हटलं. मात्र, या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं लालूप्रसाद यादव यांची निर्दोष मुक्तता केलीय. शिवाय, न्यायालयानं त्यांना सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com