नितीश सरकार कोसळून लवकरच राजदची सत्ता येणार; लालूंचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lalu Prasad

नितीश सरकार कोसळून लवकरच राजदची सत्ता येणार; लालूंचा दावा

पाटणा : बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच कोसळणार असून ७५ आमदारांच्या संख्याबळाचे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सरकार सत्तेत येईल, असा दावा पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी बुधवारी केला.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

‘राजद’च्या २५ व्या वर्धापन दिनाच्या पक्षाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी लालूप्रसाद यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, ‘‘गरिबांना अन्नधान्य देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूपीए सरकारने गरिबांना अन्नधान्य देण्यास प्रारंभ केला. केंद्र सरकार हे देशावरचे ओझे झाले आहे.’’

हेही वाचा: एसटीचं विलीनीकरण तुर्तास नाहीच; मूळ वेतनवाढीला मंजुरी

नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवाबाबत ते म्हणाले, ‘‘या पराजयातही आमचा विजय आहे. राज्य सरकारच्या अप्रामाणिकतेचा तिथे विजय झाला. मात्र यामुळे सत्य बदलणार नाही. येत्या काही दिवसांत नितीशकुमार सरकारची गच्छंती होणार, हेच सत्य आहे.’’

loading image
go to top