RJD : एक कोटी रोजगारांचे ‘राजद’चे आश्वासन; पक्षाकडून ‘परिवर्तन पत्र’ प्रसिद्ध

माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या हस्ते ‘परिवर्तन पत्र’ या जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात आले.
RJD
RJD esakal

पाटणा ः बिहारच्या महाआघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने (राजद) लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. एक कोटी रोजगारांच्या निर्मितीबरोबरच रक्षाबंधनाच्या दिवशी दारिद्र्य रेषेखालील महिलांना वार्षिक एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या हस्ते ‘परिवर्तन पत्र’ या जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात आले.

RJD
Dhule News : दोंडाईचात आरोग्य यंत्रणा कोलमडली; उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार दोनच डॉक्टरांवर

या माध्यमातून पक्षाने ‘२४ जन वचने’ जारी केली आहेत. तेजस्वी यादव माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘‘ केंद्रामध्ये इंडिया आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रीय जनता दल एक कोटी रोजगारांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करेल. यंदाच्या स्वातंत्र्यदिनापासूनच ही प्रक्रिया सुरू होणार असून तरुणांना बेरोजगारीपासून स्वातंत्र्य मिळेल. बेरोजगारी हाच आमचा सर्वांत मोठा शत्रू असून भाजपचे नेते त्याबाबत बोलत नाही. भाजपने दोन कोटी रोजगारांच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते पण त्यांना हे वचन पाळता आलेले नाही.

’’ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तिवेतन लागू करण्याचे आश्वासन देतानाच गॅस सिलिंडरची किंमत पाचशे रुपयांपर्यंत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बिहारमध्ये पायाभूत सुविधांचा विकास घडवून आणण्यासाठी पाच नवी विमानतळे उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. पूर्णिया, भागलपूर, मुझफ्फरनगर, गोपाळगंज आणि राक्सोल येथे या विमानतळांची उभारणी करण्यात येईल. बिहारमधील जनतेला दरमहा दोनशे युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अग्निपथ ही योजना रद्द करण्याची घोषणा तेजस्वी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com