राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे निधन

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे निधन

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी गुरुग्राममध्ये अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशातील जाट नेते अजित सिंह यांना कोरोनाची (COVID19) लागण झाली होती. अजित सिंह आणि त्यांची नात दोघांचेही रिपोर्ट 22 एप्रिलला पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर अजित सिंह यांच्यावर गुरुग्राममध्ये उपचार सुरु होते. 4 मेपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली. अजित सिंह यांच्या नातीची प्रकृती ठिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. (RLD President Chaudhary Ajit Singh passes away)

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे निधन
देश पुन्हा 'लॉक' होणार? केंद्र सरकारने दिले उत्तर

राष्ट्रीय लोकदलाचे नेते (Rashtriya Lok Dal) अजित सिंह यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1939 रोजी मेरठमध्ये झाला होता. माजी पंतप्रधान आणि देशातील मोठे शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचे सुपुत्र होते. भारतीय राजकारणात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com