धक्कादायक! भारतात कोरोनापेक्षा रस्त्याने घेतलेत जास्त बळी

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 September 2020

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, निष्काळजीपणे वाहन चालवणे तसेच एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात 25.7 टक्के अपघात झाले

देशात 2019 मध्ये जवळपास 4,37,396 रस्ते अपघात झाले असून यात 1,54,732 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर  4,39,262 लोक गंभीर दुखापत झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (NCRB) आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार  59.6 टक्के रस्ते अपघाताचे कारण जलदगतीने वाहन चालवणे हे आहे. यात  86,241 लोकांनी आपले प्राण गमावले असून 2,71,581 लोग जखमी झाले आहेत. 2018 मध्ये 1,52,780 तर  2017 मध्ये 1,50,093 लोकांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे. 

 आकडेवारीनुसार,  2019 मध्ये दुर्देवी घटनेतील मृतांची संख्या इतकी आहे. यात  रस्ते अपघात, प्राकृतिक आपत्ती, आणि मानवी निष्काळजीपणा यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. 2018 मध्ये 4,11,104 तर  2017 मध्ये 3,96,584 लोकांचा दुर्देवी घटनेत मृत्यू झाला होता. रस्ते अपघातमध्ये मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण हे दुचाकी वाहनाचे आहेत. यात  सर्वाधित 38 टक्के आहे. ट्रक किंवा लॉरी, कार आणि बस अपघातामध्ये अनुक्रमे  14. 6टक्के, 13.7 टक्के आणि 5.9 टक्के लोकांनी जीव गमावला आहे. 

अमेरिकन पोलिसांच्या गोळीबारात कृष्णवर्णीय युवकाचा मृत्यू; घटनेनंतर लॉस एंजेलिसमध्ये तणावपूर्ण वातावरण

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, निष्काळजीपणे वाहन चालवणे तसेच एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात 25.7 टक्के अपघात झाले असून यात  42,557 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात जवळपास 1,06,555 लोक जखमी झाले आहेत. यातून केवळ 2.6 टक्के अपघाताचे कारण हे खराब हवामान असल्याचे दिसून येते. अपघाताचे प्रमाण शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक असून ग्रामीण भागात 59.5 टक्के तर शहरी भागात  40.5 टक्के अपघातांची नोंद झाली आहे. 

"यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला"

एनसीआरबीच्या वार्षिक वार्षिक आंकडेवारीनुसार,  2019 मध्ये एकूण 27,987 रेल्वे अपघाताच्या दुर्घटना घडल्या. ज्यात 3,569 लोकांचा मृत्यू झाला. यात 24,619 लोक जखमी झाले आहेत. मागील वर्षी  रेल्वे क्रॉसिंगवर 1,788 अपघात घडले असून यात 1,762 लोकांचा मृत्यू झाला असून 165 लोक जखमी झाले आहेत. देशातील सर्वाधिक रेल्वे अपघात हे उत्तर प्रदेशात झाले असून याठिकाणी 1,788 पैकी 851 अपघात घडले आहेत.  ध्याच्या घडीला जगासह देशात कोरोनाची दहशत पाहायला मिळते. इटलीनंतर अमेरिकेत या साथीच्या रोगानं अनेक लोकांनी आपले जीव गमावले, भारतातही  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता वाढवणारा असाच आहे. परंतु कोरोनापेक्षा आपल्याकडे अपघातात अनेक लोकांनी प्राण गमावले आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road accidents took lives of more than corona one and a half lakh people in india