
राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा भारताचं खरं स्वातंत्र्य असल्याचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी इंदौरमध्ये एका कार्यक्रमात व्यक्त केलं. प्रभू रामांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा दिवस हा प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरा करायला हवा. हे अनेक शतकांच्या परकीय आक्रमणानंतर भारताच्या स्वायत्ततेच्या स्थापनेचं प्रतीक आहे असंही मोहन भागवत म्हणाले. गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. तिथीनुसार २०२५ मध्ये हा दिवस ११ जानेवारीला होता.