ठग सुकेश चंद्रशेखरचे उपोषण; पत्नीसोबत राहू देण्याची करतोय मागणी

Sukesh Chandrasekhars fast
Sukesh Chandrasekhars fastSukesh Chandrasekhars fast

२०० कोटींहून अधिकची फसवणूक करणारा आणि अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू देणाऱ्या ठग सुकेश चंद्रशेखरला दिल्लीच्या (Sukesh Chandrasekhar) तिहार तुरुंगात पत्नीसोबत राहायचे आहे. तुरुंग क्रमांक एकमध्ये बंद असलेली पत्नी लीना मारिया हिला भेटण्याची व्यवस्था त्याला हवी आहे, असे तिहार तुरुंगाच्या डीजींनी सांगितले. त्याच्या नव्या मागण्या कारागृह प्रशासनासाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. (Sukesh Chandrasekhars fast becouse Demanding to live with his wife)

सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) पत्नीला भेटण्यासाठी २३ एप्रिल ते २ मे रोजी तसेच ४ मे ते १२ मेपर्यंत उपोषण केले होते. यादरम्यान त्याने जेवण केले नव्हते. त्याची प्रकृती बिघडू नये म्हणून तुरुंगाच्या दवाखान्यात ग्लुकोज देण्यात आले, असे कारागृहाच्या डीजींनी सांगितले. सुकेश चंद्रशेखरच्या पत्नीसोबत राहण्याच्या हट्टामुळे अडचणी वाढल्या आहेत.

Sukesh Chandrasekhars fast
...अन् पोलिसांच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी पार पडला अपूर्ण विवाह

सुकेश चंद्रशेखरला आधीच महिन्यातून दोनदा म्हणजे महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी इतर कैद्यांनाही दिली जाते. याशिवाय तो पत्नीला भेटण्याचा आग्रह करीत आहे. सुकेश चंद्रशेखरची पत्नी देखील लोकांना फसवण्याच्या (Fraud) प्रकरणात भागीदार आहे. सुकेशला सर्व नियम आणि अटी झुगारून पत्नीला भेटायचे आहे. मात्र, जेल प्रशासन त्याला परवानगी देत ​​नाही आहे.

सुकेश (Sukesh Chandrasekhar) हा श्रीमंत आणि कायदेशीर लढाई लढणाऱ्या लोकांना टार्गेट करायचा. आपल्या टार्गेटच्या पार्श्‍वभूमीचा तो व्यवस्थित तपास करायचा आणि मग स्वतःला वरिष्ठ अधिकारी म्हणून सांगायचा. सुकेश सहज पटवून देत असे की तो त्याला कायदेशीर वाद सोडवण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर सुकेश हा अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी किंवा पार्टीला निधी देण्यासाठी पैसे मागत असे.

Sukesh Chandrasekhars fast
भारताने गव्हाच्या निर्यातीवरील बंदी केली शिथिल; या खेपांना परवानगी

१७ व्या वर्षी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश

सुकेशने वयाच्या १७ व्या वर्षी गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला होता. फोनवर वरिष्ठ सरकारी अधिकारी बनून तो श्रीमंतांची फसवणूक (Fraud) करायचा. २००७ पर्यंत १८ वर्षांचा होण्यापूर्वी त्याने नोकरशहा बनून शंभराहून अधिक लोकांना फसवले होते. त्याने बेंगळुरू विकास प्राधिकरणाकडून काम करून घेण्याचे खोटे आश्वासन दिले. मात्र, ते लवकरच उघड झाले. यामुळे त्याला २००७ मध्ये अटक करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com