लोकसंख्येबाबत मोहन भागवत आता म्हणाले 'हे'...

वृत्तसंस्था
शनिवार, 18 जानेवारी 2020

देशात प्रत्येक जोडप्याने दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा करणं आवश्यक आहे, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार त्यांनी उत्तर प्रदेशातील मुराबाद येथे संघाच्या कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले.

मुरादाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढचा अजेंडा हा लोकसंख्या नियंत्रणाचा असून तसा अप्रत्यक्ष इशारा आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल (ता. 17) दिला. देशात प्रत्येक जोडप्याने दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा करणं आवश्यक आहे, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार त्यांनी उत्तर प्रदेशातील मुराबाद येथे संघाच्या कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केले. 

भाजपचे ‘अब तक सत्तावन’

बंद दाराआड झालेल्या चर्चेत मोहन भागवत यांनी देशात कोणत्याही जोडप्याने दोनंच मुलं जन्माला घालावीत असा कायदा देशात लागू करण्याची गरज आहे, असे म्हणले. देशातील लोकसंख्या वाढ हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा केल्यास ही लोकसंख्या नियंत्रणात येऊ शकते. अशा कायद्यासाठी संघ नेहमीच आग्रही राहिल व जनजागृती मोहिम राबवेल असे त्यांनी यावेळी सांगितले. 

#SaturdayMotivation अन् तिने केले पुरूष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व...

लवकरच भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापनेनंतरच संघ या मुद्यातून लक्ष काढून घेईल. सीएएवरून मागे हटण्याची गरज नाही, असेही मत त्यांनी यावेळी मांडले. लोकसंख्या नियंत्रणावरून केलेल्या या वक्तव्यावरून आता विरोधक काय भूमिका घेतात, हे बघणे महत्त्वाचे असेल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSS Sarsanghachalak speaks about Population Control at Muradabad