esakal | पोलिस अधिकाऱयाचा सिंघम स्टाईल व्हिडिओ व्हायरल...
sakal

बोलून बातमी शोधा

sub inspector manoj yadav sigham style stunt video viral

एका पोलिस अधिकाऱयाचा सिंघम स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर काही जणांनी टीका केली आहे तर काही जणांनी कौतुक केले आहे.

पोलिस अधिकाऱयाचा सिंघम स्टाईल व्हिडिओ व्हायरल...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका पोलिस अधिकाऱयाचा सिंघम स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर काही जणांनी टीका केली आहे तर काही जणांनी कौतुक केले आहे.

मालकाने नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला अन्...

कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे आहेत. यादरम्यान पोलिसांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मध्य प्रदेशातील पोलिस उपनिरीक्षक मनोज यादव यांचा 32 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दुध विक्रेता लय भारी; फोटो व्हायरल...

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये मनोज यादव हे  सिंघम स्टाइल स्टंट करताना दिसत आहेत. ते दोन मोटारींच्या मध्ये उभे राहून गाणे गात आहेत. पण, हा व्हिडीओ एडिट केलेला आहे की त्यांनी स्वत: तयार केला आहे, याबद्दलची माहिती मिळू शकली नाही. पण, हा व्हिडिओ जुना असल्याच्या प्रतिक्रिया काही वाचकांनी दिल्या आहेत.

मुलगी पास झाली अभिनंदन! वडील म्हणाले, ती गेली हो...

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यामध्ये मनोज यादव यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, ते चर्चेत आले आहेत.

loading image