Russia-India Deal : रशिया आणि भारतामध्ये या आठवड्यात होणार मोठा करार

Russia and India will sign a major deal this week
Russia and India will sign a major deal this weekRussia and India will sign a major deal this week

नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान जग रशियाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे भारत (India) आणि रशियाची जवळीक वाढत आहे. दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँका म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि बँक ऑफ रशियाची पुढील आठवड्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. (Russia and India will sign a major deal this week)

ही बैठक दोन्ही देशांमधील द्विपक्षीय पेमेंट प्रणालीसंदर्भात होणार आहे. या प्रणालीवर सहमती झाल्यास दोन्ही देशांमधील पेमेंट सुलभ होईल आणि कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही. फेब्रुवारीच्या अखेरीस रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर लादण्यात आलेले निर्बंध अधिक कडक होत आहेत.

Russia and India will sign a major deal this week
महाराष्ट्रात २४ तासांत कोरोनाचे ४,०२४ नवीन रुग्ण तर २ दोघांचा मृत्यू

लोरो (Loro) किंवा नॉस्ट्रो (Nostro) प्रकारची खाती उघडण्याबाबत चर्चा करण्यासाठी दोन्ही केंद्रीय बँकांचे अधिकारी पुढील आठवड्यात भेटू शकतात. पूर्वीचे एक तृतीय पक्ष खाते आहे जिथे एक बँक देशातील दुसऱ्या बँकेसाठी खाते उघडते. तर दुसऱ्या पर्यायामध्ये बँक दुसऱ्या देशातील दुसऱ्या बँकेत खाते उघडते.

बैठकीला केंद्रीय बँकांव्यतिरिक्त दोन्ही देशांचे मंत्रालय, बँका आणि वित्तीय संस्थांचे अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आरबीआय आणि बँक ऑफ रशियाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एसबीआय, युको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक आणि इंडसइंड बँकेचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकतात. याशिवाय NPCI आणि FEDAI चे अधिकारीही सहभागी होऊ शकतात.

Russia and India will sign a major deal this week
WHO : मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलणार; हे आहे यामागील कारण

जुने मित्र जवळ येतात

रशिया (Russia) आणि युक्रेननंतर जेव्हा जगाने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली तेव्हा रशियाने भारताला कच्च्या तेलाची ऑफर दिली. अमेरिका आणि युरोपीय संघाच्या निर्बंधानंतरही रशिया आता भारताला (India) तेल आयात करणारा दुसरा सर्वांत मोठा देश बनला आहे. या प्रकरणात रशियाने आता सौदी अरेबियाला मागे टाकले आहे. सध्या भारत सर्वाधिक कच्चे तेल इराकमधून आयात करतो. भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यांनी मे महिन्यात रशियाकडून सुमारे २५ दशलक्ष बॅरल तेल खरेदी केले. हे भारताच्या एकूण तेल आयातीच्या १६ टक्क्यांहून अधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com