Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

Latest update on Putin India Visit : जाणून घ्या, मोदींसोबत डिनरपासून ते पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्था आणि करारांपर्यंत कसा असणार दौरा
Russian President Vladimir Putin arrives in New Delhi for a high-level diplomatic visit drawing global strategic attention.

Russian President Vladimir Putin arrives in New Delhi for a high-level diplomatic visit drawing global strategic attention.

esakal

Updated on

Vladimir Putin’s High-Level Visit to India: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज (गुरुवार) भारत दौऱ्यावर येत आहेत. पुतीन त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीत पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सन्मानार्थ खास डिनरची व्यवस्था केली आहे. पुतिन यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत-रशिया धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करणे आहे. 

दौऱ्याचा दुसरा दिवस -

यानंतर पुतीन त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. याशिवाय, पुतीन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटला देखील भेट देतील. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊस येथे वार्षिक शिखर बैठक आणि भारत मंडपम येथे भारत-रशिया मंचाची बैठक होईल. यानंतर पुतिन रशियाला रवाना होतील. 

तत्पुर्वी पुतीन यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, शिखर बैठकांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवणे, बाह्य दबावांपासून द्विपक्षीय व्यापाराचे संरक्षण करणे आणि लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्समध्ये संभाव्य सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे.

Russian President Vladimir Putin arrives in New Delhi for a high-level diplomatic visit drawing global strategic attention.
Putin Net Worth : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची एकूण संपत्ती किती?

सुरक्षा व्यवस्था कशी असणार? -

राष्ट्राध्यक्ष पुतीन ज्या मार्गावर प्रवास करतील त्या प्रत्येक मार्गावर सुरक्षा दल सतर्क राहील. या मार्गांवर ड्रोन, जॅमर, एआय आणि स्नायपर्सची कडेकोट सुरक्षा तैनात केलेली असणार आहे. संपूर्ण मार्गावर ड्रोनद्वारे देखरेख केली जात आहे आणि विविध ठिकाणी जॅमर तैनात केले आहेत. शिवाय, एआयची देखरेख सुरू आहे. फेस डिटेक्टर कॅमेरे बसवले आहेत आणि नियंत्रण कक्षातून त्यांचे निरीक्षण केले जात आहे.

Russian President Vladimir Putin arrives in New Delhi for a high-level diplomatic visit drawing global strategic attention.
Putin Car Features : ..म्हणून पुतीन यांच्या खास कारला एक ‘भक्कम किल्ला’ असं म्हटलं जातं

पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्था -

विशेष म्हणजे, पुतीन यांच्यासाठी खास पाच-स्तरीय सुरक्षा व्यवस्था विकसित करण्यात आली आहे, जी ते दिल्लीत येताच सक्रिय केली जाईल. पुतीन ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतील त्या हॉटेलची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पुतीन यांची अत्यंत सुरक्षित आणि रहस्यमय कार ओरस सेनाट, देखील भारतात येणार आहे. मोदी आणि पुतीन एकत्र असतील तेव्हा पहिल्या सुरक्षा कड्यात पुतीन यांच्या सुरक्षेसोबत भारताची एसपीजी देखील असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com