
Russian Woman in Gurugram Reveals Shocking Monthly Expenses
Esakal
एखाद्या शहरात आपलं घर नसेल तर भाड्याच्या घरात राहून चांगली जीवनशैली जगायची असेल तर जास्ती जास्त एका व्यक्तीला किती खर्च येऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर एखादी व्यक्ती ४० हजार, ५० हजार असं उत्तर देईल. पण एका रशिनय महिलेनं गुरुग्राममध्ये राहण्याचा जो खर्च सांगितलाय तो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. महिलेनं तिचा महिन्याचा खर्च सांगताना त्यात १बीएचके फ्लॅटचं भाडंच १.२० लाख रुपये असल्याचं म्हटलंय. यामुळे तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.