सहारा वाळवंटामुळे ॲमेझॉनला संजीवनी

सहारातील वादळाचा प्रवास
सहारातील वादळाचा प्रवास

न्यूयॉर्क - आफ्रिका खंडातील जगातील सर्वांत मोठे वाळवंट असणारे सहारा हजारो किलोमीटर दूरवर असलेल्या ॲमेझॉनच्या सदाहरित वनांना देखील पोषण मूल्यांचा पुरवठा करत असते. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय दरवर्षी ही प्रक्रिया पार पडते. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या उपग्रहाने या प्रक्रियेच्या अंतरंगाचा वेध घेणारी थ्री-डी छायाचित्रे टिपली आहेत. नासाच्या उपग्रहाने या धुळीच्या वादळाचे कशा पद्धतीने सहाराच्या दिशेने मार्गक्रमण होते, याचा वेध उपग्रहाच्या माध्यमातून घेतला आहे. यात सहारा वाळवंट ते ॲमेझॉनपर्यंतच्या भागावर पिवळ्या धुरकट रंगाची चादर पसरलेली दिसून येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सहारात निर्माण झालेली धुळीची वादळे १० हजार किलोमीटरचे अंतर पार करत थेट ॲमेझॉनच्या जंगलात जाऊन धडकतात. या धुळीत वृक्षासाठी पोषक असणाऱ्या फॉस्फरसचा समावेश असतो. मुबलक प्रमाणामध्ये फॉस्फरस उपलब्ध झाल्याने येथील वृक्षराजीची देखील जोमाने वाढ होते. नासाने या सगळ्या प्रक्रियेची थ्री डी प्रतिमा उपग्रहाच्या माध्यमातून टिपली आहे.

धूळ जेव्हा खत बनते
सहारा वाळवंटातील २२ हजार टन पोषक अशी धूळ दरवर्षी ॲमेझॉनच्या जंगलामध्ये पोचते. अटलांटिक सागरावरून ही धूळ थेट या जंगलांमध्ये जात असल्याचे दिसून आले आहे. या हवेतील मृत सुक्ष्मजीवांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे या जंगलामध्ये पोचल्यानंतर ते येथील वृक्षराजीसाठी खतासारखे काम करतात. सहारातून जेवढा फॉस्फरस ॲमेझॉनच्या जंगलांमध्ये पोचतो तेवढा ट्रकच्या माध्यमातून न्यायचा झाला तर ६ लाख ८९ हजार एवढ्या ट्रकची आवश्‍यकता भासेल असे संशोधकांनी म्हटले आहे. सहारातील सगळाच फॉस्फरस या जंगलांमध्ये पोचतो असेही नाही. काहीप्रमाणात तो समुद्रामध्येही पडतो.  या वादळांमुळे पृथ्वीचे संतुलन कायम राहत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

मृत सुक्ष्मजीवांचा आधार
सहारासारख्या शुष्क भागातील हवेमध्येही सजीवसृष्टीला पोषक असे मृत सुक्ष्मजीव असतात, असे गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमध्ये काम करणारे संशोधक होंगबिन यू यांनी सांगितले. पृथ्वीचा घनरूपी गाभा हा सूर्याच्या पृष्ठभागा इतकाच तप्त असतो. पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान ९ हजार  ८०० डिग्री फॅरेनहिट एवढे आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे दहा हजार फॅरेनहिट एवढे आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com