वाह! सासऱ्यांनी लावून दिलं विधवा सुनेचं लग्न; लग्नात दिले लाखोंचे दागिने अन् कार भेट

father in law performs kanyadan of his widow daughter in law
father in law performs kanyadan of his widow daughter in law

सहारनपूर : मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्यांनी सुनेला मुलीसारखं सांभाळलं. एवढच नाही तर तिला पुन्हा लग्न करण्यास उद्युक्त केले. सुनेने होकार दिल्यावर तिचं पुन्हा थाटामाटात लग्न करून दिलं. विशेष म्हणजे, सासऱ्यांनी मुलीप्रमाणे सुनेचं कन्यादान केल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील बडगाव शहरात घडली. या व्यतिरिक्त सासऱ्यांनी सुनेला लग्नात एक कार आणि लाखो रुपयांचे दागिने भेट दिले.

father in law performs kanyadan of his widow daughter in law
Viral Video: आयुष्यात जोखीम पत्कारावीच लागते पण... हत्तीच्या कृतीचा बोध देणारा व्हिडिओ

सहारनपूरच्या बडगाव शहरातील सावंत खेडी गावचे माजी प्रधान जगपाल सिंह यांचा मुलगा शुभम राणा याचा विवाह 2021 साली मेरठ जिल्ह्यातील सलवा गावात राहणाऱ्या मोनासोबत झाला होता. मात्र घरात लग्नाचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही लग्नाच्या तीन महिन्यातच शुभमने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूमुळे जगपाल सिंह यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिवाय त्यांना आपल्या सुनेच्या भविष्याची चिंता वाटू लागली. त्यांनी सुनेला आपल्या मुलीचा दर्जा दिला. तसेच कुटुंबातील सदस्यांशी सल्लामसलत करून सुनेचं पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचाः शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

father in law performs kanyadan of his widow daughter in law
Viral: भक्ती पडली महागात! हत्तीच्या पायात अडकून पडला, बाहेर येणार कसा?

दरम्यान लग्नाबाबत सासरे जगपाल यांनी सुनेचे मतही जाणून घेतले होते. सुनेने होकार दिल्यावर त्यांनी हरियाणातील गोलाणी येथे राहणाऱ्या सागरसोबत सुनेचं लग्न जुळवलं.

सागर आणि जगपाल यांचे आधीपासूनच नातेसंबंध होते. सागर जगपाल सिंह यांचा भाचा असून ४ डिसेंबर रोजी सहारनपूर शहरातील एका बँक्वेट हॉलमध्ये हा विवाह झाला. संरपंच जगपाल सिंह यांनी आपल्या विधवा सुनेचा धुमधडाक्यात पुनर्विवाह करून आदर्श निर्माण केला आहे. सिंग यांनी आपल्या विधवा सुनेचे लग्न लावून दिलेच, शिवाय मुलगी दान करून त्यांना निरोपही दिला. या स्तुत्य निर्णयाचं संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com