
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता. आता तो उपचारानंतर घरी परतलाय. तर हल्ल्या प्रकरणी एका आरोपीला अटकही करण्यात आलीय. तो बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राच्या गृह विभागातील अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला आदेश दिलेत.