सकाळचं 'पॉडकास्ट' देशात पहिल्या दहामध्ये

स्थानिक भाषेतील सर्वात मोठा न्यूज शो होण्याचा मान सकाळ पॉडकास्टने मिळविलाय.
podcast
podcast

रोजच्या हटके बातम्या आणि चालू घडामोडींविषयी असलेल्या सकाळच्या पॉडकास्टला देशातील टॉप १० मध्ये येण्याचा मान मिळविलाय. खरतर सकाळ मिडीयाने सुरु केलेल्या पॉ़कास्टला श्रोत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच हे साध्य होऊ शकलंय. भारतातील पहिल्या दहामध्ये सकाळ पॉडकास्ट पाचव्या क्रमांकावर आहे. मराठी माध्यमातील पॉडकास्टचा हा प्रयोग वर्षभरातच श्रोत्यांच्या पसंतीला उतरलाय, याचा सकाळ टिमला अतिशय आनंद होतोय.

(Sakal Podcast )

स्थानिय भाषेतील (Regional Language show) सर्वात मोठा न्यूज शो होण्याचा मानही सकाळ पॉडकास्टने मिळविलाय. सकाळच्या पॉडकास्टमध्ये विश्वसनीय बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतात. हवामानाचे अपडेट, क्रिडा क्षेत्रातील आपडेट, मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी ते राज्यातील मोठी घडामोड एवढंच नव्हे तर देशातील आणि राज्यातील सर्वात चर्चेत असलेली बातमी तुम्हाला ऐकवतो. 'जग हे छोटे खेडे झालंय' असं आपण म्हणतो मग जागतिक महत्वाच्या घडामोडी अगदी सोप्या शब्दात आम्ही देतोय. भारताच्या शेजारिल राष्ट्र श्रीलंकेतील प्रत्येक अपडेट बरोबरच भारतातील निर्णयाचा जगावर होणार परिणामही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.

podcast
MNS : मनसेची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे मुंबईकडे रवाना

राज्यात अनेक राजकिय घडामोडी, सभा होत असतात, ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी बरोबरच रोजच्या जगण्यावर परिणाम करणाऱ्या घटनाही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने येणारे निर्णय, परिक्षांचं वेळापत्रक, निकालाच्या तारखा ते नोकरिच्या संधी, गृहीणींशी संबंधित किचन ते त्यांचं आरोग्य अशा सर्व विषयांचा समावेश या पॉडकास्टमध्ये आहे.

आठवड्याच्या शेवटी अनप्लग सेलिब्रेटी टॉक शो मध्ये मराठी आणि हिंदीतीलही सेलिब्रेटींशी आपण गप्पा मारतो. दर शनिवारी ' सकाळ अनप्लग' या सेलिब्रेटी टॉक शो मध्ये आतापर्यंत अभिनेत्री उर्फी जावेद, तसंच मराठीतील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मधील मधुराणी गोखले, शिवाय शेर शिवराजमधील अभिनेता चिन्मय मांडलेकरशी देखील या शो मध्ये सहभागी झाला होता, तसंच हृता दुर्गडे ही अभिनेत्री देखील सहभागी झाली होती. त्यामुळे जर तुम्ही ही बातमी वाचताय, तर नक्की सकाळचं पॉडकास्ट ऐकायला विसरु नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com