
'एक देश, एक निवडणूक' विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं यानंतर आता त्यावर जेपीसीमध्ये चर्चा होणारेय.....पार्किंगवरुन भारतीय अन् पाकिस्तानी व्यक्तीचं दुबईत भांडण झाल्यानं एकाला देश सोडायची शिक्षा मिळालीए....मुंबईत होणार गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब, तीस लाख घरांसाठी सवलतींची खैरात होणारेय...गुगलनं प्रीती लोबाना यांच्यावर सोपवली महत्वाची जबाबदारी.....तसंच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून वगळल्यानं पृथ्वी शॉला नाराज, केली पोस्ट तर संजय दत्तानं दुबईत सुरु केलंये हॉटेल पण इथं फक्त दोनच पदार्थ मिळतात......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....