

Salman Khan Post
ESakal
सलमान खानने अलीकडेच जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने पेपरफुटीला एक गंभीर मुद्दा म्हटले होते. या पोस्टने बरीच चर्चा मिळवली. यानंतर आता सलमान खानने पुन्हा एकदा सोशल मीडियावर विद्यार्थी आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. आपल्या नव्या पोस्टमध्ये, भाईजानने विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन केले आहे. जबाबदार लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.