

उत्तराखंडच्या बाजारात लवकरच एक खास असं मीठ येणार आहे. बंबू सॉल्ट हे जगभरात कोरियन मीठ म्हणून ओळखलं जातं. या कोरियन मीठाला सर्वात आधी कोरियात तयार केलं होतं. आरोग्यासाठी पौष्टीक असलेल्या या मीठात पोषक तत्व असतात. उत्तराखंडच्या वन विभागाच्या बांबू आणि फायबर विकास बोर्ड आणि जायका यांनी मिळून बंबू सॉल्ट तयार केलंय. जगभरात सर्वात महाग असं हे मीठ असून उत्तराखंडच्या वन विभागाने याचा अभ्यास करून ते तयार करण्याची तयारी सुरू केलीय. मीठ तयार करण्यासाठी ६ पेक्षा जास्त वेळा ट्रायल घेण्यात आली.