Lok Sabha Election: सपाने मेरठमध्ये पुन्हा बदलला उमेदवार, अतुल प्रधान यांचे तिकीट कापलं अन् खेळली मोठी खेळी....लक्षवेधी लढत

Lok Sabha Election: प्रधान यांच्या आधी येथे भानुप्रताप सिंह यांना ‘सप’ने उमेदवारी दिली होती. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत ‘सप’चे तळ्यात मळ्यात सुरू असल्याची टीका आता होत आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

नवी दिल्ली : भाजपचे फायरब्रॅंड नेते संगीत सोम यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करीत चर्चेत आलेले नेते अतुल प्रधान यांना समाजवादी पक्षाने(सप) मेरठ लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्या ऐवजी सुनीता वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रधान यांच्या आधी येथे भानुप्रताप सिंह यांना ‘सप’ने उमेदवारी दिली होती. त्यामुळे येथील उमेदवारीबाबत ‘सप’चे तळ्यात मळ्यात सुरू असल्याची टीका आता होत आहे.

सुनिता वर्मा या मेरठच्या माजी महापौर असून माजी आमदार योगेश वर्मा यांच्या त्या पत्नी आहेत. आधी बहुजन समाज पक्षात असलेल्या सुनिता या नुकत्याच ‘सप’मध्ये दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अतुल प्रधान यांनी, पक्षाचा निर्णय मान्य असून सुनिता वर्मा यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेशातील या मतदारसंघात भाजपने रामायण मालिकेत रामाची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता गोविल विरुद्ध वर्मा अशी झुंज याठिकाणी पहावयास मिळणार आहे.

Lok Sabha Election
Shoma Sen: भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. शोमा सेन यांना जामीन मंजूर

रामायण मालिकेतील रामाच्या भूमिकेमुळे अरुण गोविल प्रसिद्ध आहेत. चर्चित चेहरा ही ओळख त्यांच्या कामी येणार असल्याचे बोलले जात आहे. ‘सप’ने मेरठमध्ये भानुप्रताप सिंह यांना तिकीट दिले होते. मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापत अतुल प्रधान यांचा चेहरा समोर आणला गेला होता.

गोविल यांना ‘रालोआ’ आघाडीतील राष्ट्रीय लोकदल, अपना दल, सुभासपा आणि निषाद पक्षाचे समर्थन मिळणार आहे. बसपकडून याठिकाणी देवव्रत त्यागी निवडणूक लढवीत आहेत. अतुल प्रधान अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय असूनही त्यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे राजकीय वर्तुळातून याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Lok Sabha Election
Lok Sabha Election: ऐकावं ते नवलच! उमेदवारानं प्रचारासाठी हाती घेतला वस्तरा! म्हणाला, दाढी करतो मत द्या...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com