अमित शहांच्या JAMला यादवांंचं प्रत्युत्तर; यूपीच्या राजकारणात काय आहे हा JAM? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहांच्या JAMला यादवांंचं प्रत्युत्तर; यूपीच्या राजकारणात काय आहे हा JAM?

अमित शहांच्या JAMला यादवांंचं प्रत्युत्तर; यूपीच्या राजकारणात काय आहे हा JAM?

लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरदार सुरु आहे. आगामी निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी विरोधक आपली कंबर कसत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजप विरोधकांचे मनोबल आतापासूनच खच्ची करण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अमित शहा यांच्या एका वक्तव्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शहा गेल्या दोन दिवसांत यूपी दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे काम केले. यावेळी त्यांनी 'JAM' संदर्भात एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला आता अखिलेश यादव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा: नक्षलवादी नेता मिलिंद तेलतुंबडे ठार; आणखी तिघांना कंठस्नान?

काय म्हटलं होतं अमित शहा यांनी?

गृहमंत्री अमित शहा आमि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी आझमगडमध्ये स्टेट युनिव्हर्सिटीची पायाभरणी केली होती. आझमगडमधूनच अखिलेश यादव देखील खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

अमित शहा यांनी म्हटलं होतं की, मोदींनी JAM आणला आहे, जेणेकरुन भ्रष्टाचाराविना खरेदी व्हावी. J चा अर्थ आहे जनधन खाते, A चा अर्थ आहे आधार आणि M चा अर्थ आहे प्रत्येक हातात मोबाईल. तर समाजवादी पक्षाने देखील JAM आणला आहे. सपाच्या J चा अर्थ आहे जिन्ना, A चा अर्थ आहे आजमखान आणि M चा अर्थ आहे मुख्तार, असं त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा: अमरावती हिंसाचार : परिस्थिती नियंत्रणात, पण इंटरनेट सेवा तीन दिवस बंदच

अखिलेश यादवांचा पलटवार

यावर आता अखिलेश यादव यांनी पलटवार केला आहे. समाजवादी पक्षाने भाजपचा नवा JAM समोर आणला आहे. J म्हणजे झूठ म्हणजेच खोटे, A म्हणजे अहंकार आणि M म्हणजे महगाई. भाजपने त्यांच्या या JAM वर आधी प्रतिक्रिया द्यायला हवी, असं त्यांनी म्हटलंय. अखिलेश यादव यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख म्हटलंय की, शेतकऱ्यांचा जीव चालला आहे मात्र, सरकारला त्याची जराही काळजी नाही. गृहराज्य मंत्री आणि त्यांच्या मुलावर शेतकऱ्यांना चिरडण्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांना तर यांनी चिरडलंय मात्र, यांना संधी मिळाली तर हे संविधान देखील चिरडून टाकतील. इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाची किंमत वाढली की सगळ्याच वस्तूंच्या किंमती वाढतात. सरकारने फक्त रंग आणि नाव बदलण्याचं काम केलं आहे.

loading image
go to top