संयुक्त किसान मोर्चाची बैठक संपली; 29 नोव्हेंबरच्या 'ट्रॅक्टर रॅली'ला स्थगिती

Kisan Tractor Rally
Kisan Tractor Rally esakal
Summary

ट्रॅक्टर रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आलीय.

दिल्ली : नवीन शेतीविषयक कायदे लागू झाल्यानंतर, शेतकरी 29 नोव्हेंबरला संसदेत जाणार की घरी परतणार, असा निर्णय शनिवारी सिंघू सीमेवर (Singhu Border) होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या (SKM) बैठकीत घेण्यात आला. दुपारी दीड वाजता सुरू झालेली शेतकरी सभा नुकतीच संपली असून तासभर चाललेल्या महापंचायतीत ट्रॅक्टर रॅली (Tractor Rally) न काढण्याचे मान्य करत रॅलीला स्थगिती देण्यात आलीय.

याबाबत शेतकरी नेते त्यांच्या पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे, 26 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शेतकऱ्यांनी 29 नोव्हेंबरला संसदेच्या दिशेने ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर (Ghazipur Border) सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आलीय.

Kisan Tractor Rally
'शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारचा जनता कडेलोट करेल'
Singhu Border
Singhu Border

आज सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या बैठकीत एमएसपी, जमीन कायदा, वीज दुरुस्ती कायदा, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई, मृत शेतकर्‍यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणे आणि आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांवर दाखल झालेला एफआयआर मागे घेण्याची मागणी या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच एमएसपी हमीभाव, प्रदूषणाशी संबंधित कायद्यांतर्गत शेतकऱ्यांवर कोणताही दंड न करणे, वीज दुरुस्ती कायदा रद्द करणे यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, संयुक्त किसान मोर्चानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पत्र लिहून विविध मागण्या केली आहेत. मात्र, सध्या तरी सरकारकडून शेतकर्‍यांना चर्चेचे कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.

Kisan Tractor Rally
मेक्सिकोत बस घरावर आदळून भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू, 32 प्रवासी जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com