माजी मंत्र्याच्या सुनेची हत्या, पती अन् बॉयफ्रेंडसोबत बेडरूममध्ये दारु पिताना काय घडलं?

Sangeeta Ahirwar Murder Case : महिला तिच्या पती आणि बॉयफ्रेंडसोबत बेडरूममध्येच दारू पार्टी करत होती. यावेळी झालेल्या वादानंतर महिलेची हत्या करण्यात आली.
Sangeeta Ahirwar Murder Case
Sangeeta Ahirwar Murder CaseEsakal
Updated on

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये महिलेनं बॉयफ्रेंडला हाताशी धरून पतीची हत्या केल्याचं प्रकरण ताजं असतानाच झाशीमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. माजी मंत्र्याच्या सुनेचा मृतदेह बेडरूममध्ये आढळलाय. महिला तिच्या पती आणि बॉयफ्रेंडसोबत बेडरूममध्येच दारू पार्टी करत होती. यावेळी झालेल्या वादानंतर महिलेची हत्या करण्यात आली. भाडेकरून या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. बेडवर महिलेचा मृतदेह पडला होता. तिच्या शेजारी बॉयफ्रेंड दारूच्या नशेत झोपला होता. तर तिचा पती खोलीत एका बाजूला सोफ्यावर होता. पोलिसांनी दोघांनाही अटक केलीय. महिलेच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि शरिरावर जखमांचे व्रण आढळले आहेत.

Sangeeta Ahirwar Murder Case
पंतप्रधान मोदींचे ३६ महिन्यात ३८ परदेश दौरे, २५८ कोटी रुपये खर्च; वाचा कुठे, कधी किती खर्च?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com